स्पर्श पोर्टलवरील अडचणी दूर करण्यासाठी धाराशिवमध्ये CSC केंद्रे सुरू होणार ; माजी सैनिकांकडून अर्ज मागविले

Spread the love

धाराशिव – राज्य सैनिक बोर्ड व जिल्हा सैनिक बोर्ड यांच्या निर्देशानुसार माजी सैनिकांना स्पर्श प्रणाली (SPARSH Portal) वापरताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने CSC (Common Service Centres) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या आवारात तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक CSC केंद्र सुरू करण्यात येणार आहे.ही केंद्रे चालविण्यासाठी इच्छुक माजी सैनिकांची आवश्यकता असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांना कळविण्यात येते की, CSC चालविण्यास इच्छुक असलेल्या माजी सैनिकांनी आपली नावे व अर्ज आवश्यक संबंधित कागदपत्रांसह २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धाराशिव येथे सादर करावेत,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या संदर्भात अधिक माहितीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,धाराशिव येथे संपर्क साधावा.संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक ०२४७२- २२२५५७ तसेच भ्रमणध्वनी क्रमांक ७५८८५२७५५४ उपलब्ध असून,इच्छुक माजी सैनिकांनी वेळेत अर्ज सादर करून या उपक्रमात सहभागी व्हावे,असेही आवाहन करण्यात आले आहे.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *