निवृत्तीवेतनधारकांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी २८ जानेवारीला धाराशिव येथे पेन्शन अदालत

Spread the love

धाराशिव – जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की,महालेखाकार कार्यालय,नागपूर व कोषागार कार्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने निवृत्तीवेतनधारकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कोषागार कार्यालय,धाराशिव येथील बैठक हॉलमध्ये पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या अनुषंगाने जिल्हा कोषागार अधिकारी, धाराशिव यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख,आहरण व संवितरण अधिकारी तसेच निवृत्तीवेतनाशी संबंधित कामकाज करणारे अधिकारी व कर्मचारी आणि सर्व निवृत्तीवेतनधारक यांनी आपल्या प्रलंबित अथवा इतर समस्यांचे निराकरण करून घेण्यासाठी आवश्यक ते अभिलेख व कागदपत्रांसह वरील ठिकाणी उपस्थित राहावे.

निवृत्तीवेतनधारकांच्या समस्या तात्काळ मार्गी लावण्याच्या दृष्टीने या पेन्शन अदालतीचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्रीमती.अर्चना नरवडे,जिल्हा कोषागार अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *