निवृत्ती वेतन नसलेल्या ६५ वर्षांवरील माजी सैनिक व विधवांची माहिती सादर करण्याचे आवाहन

Spread the love

धाराशिव – जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या व्याख्येत न बसणारे तसेच सैन्यातील निवृत्ती वेतन मिळत नसलेल्या ६५ वर्षांवरील सैनिक व सैनिकांच्या विधवांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.या अनुषंगाने संबंधित पात्र व्यक्तींचा तपशील दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सैनिक कल्याण विभाग,पुणे येथे सादर करण्यात येणार आहे.

त्या अनुषंगाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,धाराशिव यांनी जिल्ह्यातील पात्र सैनिक व विधवांना आपली माहिती २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंत कार्यालयात सादर करण्याचे आवाहन केले आहे.

या योजनेसाठी पात्रतेच्या अटी स्पष्ट करण्यात आल्या असून,सैन्यसेवा केलेली मात्र माजी सैनिकांच्या व्याख्येत न बसणारी ६५ वर्षांवरील व्यक्ती (विधवांसाठी वयोमर्यादा लागू नाही),सैन्यसेवेतून बडतर्फ झालेला नसावा, KSB/ZSB कडून चरितार्थासाठी आर्थिक मदतीस अपात्र असलेली व्यक्ती,अर्धसैनिक बलातील नसावा तसेच Territorial Army मध्ये सेवा केलेल्या सैनिकांचा यामध्ये समावेश करावा.यासोबतच,ज्यांच्याकडे चरितार्थासाठी कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही अशाच व्यक्तींची नावे सादर करण्यात येणार आहेत.

पात्र सैनिक व विधवांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत माहिती सादर करून या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,धाराशिव यांनी केले आहे.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *