रस्ता सुरक्षा अभियान २०२६ : शाळा,टोल नाका व महामार्गावर विविध उपक्रम

Spread the love

धाराशिव – रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या.
शाळेत विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन

१३ जानेवारी रोजी श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय,धाराशिव येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मोटार वाहन निरीक्षक श्री.सचिन बंग व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री.शिवाजी बहीर यांनी शालेय विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी Walk on Right नियम, हेल्मेट व सीट बेल्टचे महत्त्व,वेग मर्यादेचे पालन,मद्यपान करून वाहन न चालविणे तसेच विविध रस्ता चिन्हांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.रस्त्यावर अपघात झाल्यास अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा विषयक प्रश्नमंजुषा घेण्यात येऊन पारितोषिकांचे वितरण करण्यात आले आणि माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.

तामलवाडी टोल नाक्यावर मोफत आरोग्य शिबीर
रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत धाराशिव–सोलापूर महामार्गावरील तामलवाडी टोल नाका येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात मोटार वाहन निरीक्षक श्री. सुनील शिंदे,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री.विशाल भगरे,सहायक पोलिस निरीक्षक गोकूळ ठाकूर, वाहतूक पोलीस कर्मचारी,IRB चे सावंत,तामलवाडी टोलनाक्यावरील सर्व कर्मचारी व डॉक्टर उपस्थित होते.

अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट’ची पाहणी व उपाययोजना
१४ जानेवारी रोजी सोलापूर –तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांना आळा घालण्यासाठी परिवहन विभाग,महामार्ग पोलीस, स्थानिक पोलीस व तामलवाडी टोल नाका प्रशासनाच्या वतीने अपघातप्रवण ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट) पाहणी करण्यात आली.

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ते माळुंब्रा दरम्यान सातत्याने अपघात घडत असल्याने या परिसराची सखोल पाहणी मोटार वाहन निरीक्षक श्री.सुनील शिंदे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री. विशाल भगरे, IRB चे सुपरवायझर श्री.ज्योतिलिंग सावंत,श्री.पी.डी. शाहू व श्री.नितीन भोसले यांनी केली.

यावेळी सुरतगाव,वडगाव–काटी, सांगवी–काटी,मुक्तीनगर,गोंधळवाडी पाटी,कदमवाडी या ‘डेंजर झोन’ ठिकाणांची पाहणी करून आवश्यक उपाययोजनांबाबत टोल नाका प्रशासनाला निर्देश देण्यात आले. तसेच मोटार वाहन निरीक्षक श्री.सुनील शिंदे यांनी सांगवी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधून सभेमध्ये रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *