दहावी-बारावीनंतर करिअरची योग्य दिशा : तुळजापूर येथे मानसशास्त्रीय कलचाचणी व समुपदेशन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

Spread the love

धाराशिव – दहावी व बारावीनंतर योग्य करिअरची निवड कशी करावी, मानसशास्त्रीय चाचण्यांच्या आधारे भविष्यातील करिअरविषयक निर्णय कसे घ्यावेत,या उद्देशाने श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,तुळजापूर येथे १६ जानेवारी २०२६ रोजी मानसशास्त्रीय कलचाचणी व करिअर समुपदेशन कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली.सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांची जागतिकस्तरावर वापरली जाणारी इंटरेस्ट प्रोफाईलर JP ही मानसशास्त्रीय कलचाचणी घेण्यात आली.

या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतातील एकूण ५२ प्रमुख करिअर क्षेत्रांमधील उपलब्ध असलेल्या शेकडो जॉब रोल्सपैकी आपल्या आवडीनिवडी,क्षमता व कौशल्यांशी सुसंगत जॉब रोल निवडण्यास मदत होणार आहे.ही चाचणी जागतिक स्तरावर कार्यस्थळावरील मूल्ये (वर्किंग व्हॅल्यूज) ओळखण्यासाठी वापरली जाते.या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू,कार्यमूल्ये तसेच त्यानुसार योग्य करिअर पथ निवडण्याबाबत स्पष्टता मिळाली.

या मानसशास्त्रीय कलचाचणीमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्व-ओळख निर्माण होऊन भविष्यातील करिअरविषयक निर्णय वैज्ञानिक दृष्टिकोनातून घेण्यास मदत झाली.श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सुमारे ८९ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रम व रोजगार मंत्रालयाचे समुपदेशक श्री.दत्तात्रय सुभाष कांबळे,मॉडेल करिअर सेंटर,लातूर यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.ही कार्यशाळा कौशल्य विकास विभागाच्या उपायुक्त श्रीमती विद्या शितोळे,सहाय्यक आयुक्त श्री.संजय गुरव तसेच श्री.दत्ता चव्हाण (परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी सहाय्यक आयुक्त,धाराशिव) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.

या उपक्रमासाठी सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य श्री.वैजनाथ घोडके,शिक्षकवृंद व कर्मचारी तसेच जिल्हा कौशल्य विकास कार्यालय, धाराशिव येथील श्री.बाबासाहेब शेटे व श्रीमती विद्या नाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

  • Related Posts

    क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा तर्फे आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव:- समता नगर क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा कडुन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य उपक्रमाच्या आयोजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य हितासाठी नगर सेवक नाना घाटगे यांनी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग…

    मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय समारंभ 17 सप्टेंबरला – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *