पुण्याच्या येरवडा कारागृहात कैद्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Spread the love

येरवडा/विश्व प्रशांत न्यूज

पुणे – पुण्याच्या येरवडा जेलमध्ये कैद्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कारण एका करागृहात असलेल्या कैदयाच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका कैद्याची हत्या करण्याचा प्रयत्न थोडक्यात फसला आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात एका कैद्यावर फरशीने हल्ला झाला आहे. कैदयाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   पुण्याच्या येरवडा जेलमध्ये थरारक घटना घडली आहे. येरवडा कारागृहातील बराकीत झालेल्या वादातून कैद्यांनी एकावर फरशीने हल्ला केला आहे. कैद्याच्या डोक्यात फरशी घालून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे राज्यातील इतरही कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
  विशाल नागनाथ कांबळे वय २८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा असे गंभीर जखमी झालेल्या कैदयाचे नाव आहे. त्याच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आकाश सतीश चंडालिया वय ३०, रा. जयजवाननगर, येरवडा, दीपक संजय रेड्डी वय २७, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील येरवडा कारागृह अधिकारी सचिन गुरव यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
  येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंडालिया, रेड्डी, कांबळे हे सराईत गुन्हेगार आहेत. येरवडा भागातील एका खून प्रकरणात चंडालियाला अटक करण्यात आली होती. येरवडा कारागृहातील सी. जे. विभागातील बराक क्रमांक एकमध्ये तिघांना ठेवण्यात आले आहे. चंडालिया, रेड्डी आणि कांबळे यांच्यात कारागृहात वाद झाले होते.14 डिसेंबर 2025 रोजी पावणे सातच्या सुमारास चंडालिया, रेड्डी यांनी कांबळे याच्यावर फरशीच्या तुकड्याने हल्ला केला होता. त्याच्या डोक्यात फरशीचा तुकडा घातला होता. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. आरडा ओरडा ऐकून कारागृहातील रक्षकांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी चंडालिया आणि रेड्डी यांना रोखले होते.
  जखमी अवस्थेतील कांबळे याला तातडीने रग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच येरवडा विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक जराड तपास करत आहेत.
  येरवडा कारागृहात यापूर्वी किरकोळ वादातून कैद्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. कैद्यांमधील हाणामारी, चोरून मोबाइल संच, तसेच अमली पदार्थ आणणे असे गैरप्रकार घडल्याने येरवडा कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर कारागृहातील हाणामारीच्या घटना कमी झाल्या नाहीत , तसेच गैरप्रकारही कमी झाले नाहीत. पुण्याच्या येरवडा जेलमध्ये  कैदयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चैत आला आहे. कारण येरवडा कारागृहात एका कैद्याची हत्या करण्याचा प्रयत्न झाला आहे. यावरून असे दिसुन येत आहे की, कैदयांच्या सुरक्षेवर प्रशासनाचे लक्ष नाही.

  • Related Posts

    धाराशिवच्या महिलांची उद्योगक्षेत्रात झेप ; ६२२ उद्योजिकांनी घडविला नवा इतिहास

    Spread the love

    Spread the loveधाराशिव –  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील महिलांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय भरारी घेतली असून,पारंपारिक चौकटीतून बाहेर पडत त्यांनी स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या १०१५…

    येरमाळा – श्री माता येडेश्वरी चैत्र यात्रा चुन्याच्या रानातील भाविक भक्तांची गर्दी

    Spread the love

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *