कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ५००० जीवनावश्यक किट वाटपाचा शुभारंभ

Spread the love

धाराशिव: जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांसाठी कोटक बँकेने सामाजिक उत्तरदायित्वाच्या (CSR) माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते ५००० जीवनावश्यक वस्तूंच्या किट असलेल्या वाहनास हिरवा झेंडा दाखवून या मदतकार्याचा शुभारंभ करण्यात आला.

धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागांना या उपक्रमाचा थेट लाभ मिळणार आहे. यामध्ये अंतरगाव, तांदुळवाडी फाटा, माणकेश्वर, पिठापुरी, देवळाली, खासापुरी, कानडी तांडा वस्ती, घिसाडी समाज, ऊसतोड वस्ती, करंजा गाव कामगार, वडार वस्ती आणि डावरी समाज वस्ती या भागांतील गरजू कुटुंबांना मदत पोहोचवली जाणार आहे.

अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी राबवण्यात आलेला हा उपक्रम मानवतेचे खरे उदाहरण ठरला आहे. या मदत वाटप कार्यक्रमावेळी गावातील ग्रामस्थ, शेतकरी बांधव आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी कोटक बँक, धाराशिव शाखेचे व्यवस्थापक तारीख अहमद, तसेच रामेश्वर मेंगले, गौरव राजूरकर आणि बँकेचे इतर कर्मचारी उपस्थित राहून या कार्यात सक्रिय सहभागी झाले.

  • Related Posts

    अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जप्रकरणांवर धाराशिवमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा!

    Spread the love

    Spread the loveअध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे मराठा सेवा संघातर्फे स्वागत; मराठा तरुणांच्या आर्थिक प्रश्नांवर सविस्तर संवाद धाराशिव : प्रशांत मते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मा. नरेंद्र पाटील यांचे…

    आळणी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आळणी येथे १६ ऑगस्ट रोजी मिनी मॅरेथॉन;

    Spread the love

    Spread the loveविद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनआळणी, ता. जि. धाराशिव : स्व. शंकरराव रंगनाथ फुगारे (साळुंके) सर यांच्या स्मरणार्थ आयोजित आळणी ग्रामस्थ व फुगारे परिवाराच्या वतीने ‘आळणी मिनी मॅरेथॉन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *