आळणी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आळणी येथे १६ ऑगस्ट रोजी मिनी मॅरेथॉन;

Spread the love

विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
आळणी, ता. जि. धाराशिव :

स्व. शंकरराव रंगनाथ फुगारे (साळुंके) सर यांच्या स्मरणार्थ आयोजित

आळणी ग्रामस्थ व फुगारे परिवाराच्या वतीने ‘आळणी मिनी मॅरेथॉन स्पर्धा २०२६’*चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे दुसरे यशस्वी वर्ष असून, विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण करणे, शारीरिक तंदुरुस्ती व आरोग्याविषयी जागरूकता वाढविणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
ही स्पर्धा रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. स्पर्धेचा प्रारंभ आळणी अंतर्गत रस्त्यावरून होणार असून, अंतिम ठिकाण ग्रामपंचायत कार्यालय, आळणी येथे राहणार आहे. विजेत्यांना सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे तीन गट करण्यात आले आहेत.
गट क्र. १ : इयत्ता २ री ते ४ थी,
गट क्र. २ : इयत्ता ५ वी ते ७ वी,
गट क्र. ३ : इयत्ता ८ वी ते १० वी.
प्रत्येक गटामध्ये मुलांचे तीन व मुलींचे तीन विजेते निवडण्यात येणार असून, विजेत्यांना मेडल, ट्रॉफी व आकर्षक बक्षिसे व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक उपचार व पाण्याची सोय करण्यात येणार आहे.

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा उपक्रमात आळणी परिसरातील विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन श्री. उमाकांत शंकर फुगारे (साळुंके), श्री. योगेश उमाकांत फुगारे (साळुंके), फुगारे परिवार व आळणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ८१७७९८८४०० / ९४०५६६०६०३

  • Related Posts

    जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रयत्नआधार नोंदणीच्या माध्यमातूनमुकबधिर बालकाचे कुटुंब शोधण्यात यश

    Spread the love

    Spread the loveअकोला – : जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि आधार नोंदणी प्रक्रियेचा प्रभावी वापर करून एका मुकबधिर हरविलेल्या बालकाचे कुटुंब शोधण्यात यश आले.बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनात ही…

    फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीकडून उपवर्गीकरण (अबकड) विरोधी मोर्चात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जिल्हाधिकारी यांना निवेदन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : आरक्षण उपवर्गीकरण (अबकड) विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात फुले,शाहू, आंबेडकर उद्यान कृती समितीने सक्रीय सहभाग घेतला.यावेळी समितीच्या वतीने मोर्चात सहभागी झालेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *