
मेरा युवा भारत धाराशिव (उस्मानाबाद), कै.चंद्रभान लोमटे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित, धीरूभाई अंबानी लिटल चॅम्प्स, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या सभागृहात 26 वा कारगिल विजय दिवस दिनांक 26.07.2025 रोजी आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी कारगिल युद्धात शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी मेजर अनंत अर्जुन शेलार यांचा सन्मान करण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य काळे सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमास मेरा युवा भारत धाराशिव (उस्मानाबाद) वैभव लांडगे, बाळकृष्ण साळुंखे,प्रशांत मते व विद्यालयाचे प्रवीण वडवले सर, शेख सर, मिसाळ सर, माळी सर, सारडे सर, खोशे सर इत्यादी उपस्थित होते. या कारगिल विजय दिवस निमित्त धीरूभाई अंबानी माध्यमिक विद्यालयात कारगिल विजय दिवस ह्या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक गणेश विलास घाडगे,द्वितीय क्रमांक अक्षता महादेव कांबळे, तृतीय क्रमांक गायकवाड राजनंदिनी बाळासाहेब ह्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक खोशे सर यांनी केले.