श्री सिद्धिविनायक सोशल फाउंडेशनच्या बुद्धीमंथन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादl

Spread the love

१८० खेळाडूंचा सहभाग, ३० हजारांचे रोख पारितोषिक वाटप

धाराशिव – जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त श्री सिद्धिविनायक सोशल फाउंडेशनच्यावतीने आयोजित ‘जि. एच. रायसोनी चषक २०२५ रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २० जुलै रोजी शहरातील श्री सिद्धिविनायक परिवार हॉल, छत्रपती संभाजी महाराज नगर येथे उत्साहात पार पडली. धाराशिव जिल्हा बुद्धिबळ संघटना, जी. एच. रायसोनी स्पोर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर फाउंडेशन आणि कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन यांच्या सहकार्याने ही एकदिवसीय स्पर्धा पार पडली. या भव्य स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण १८० बुद्धिबळपटूंनी सहभाग नोंदवला. यामध्ये धाराशिव तालुक्यातून ७०, परांडा ४०, तुळजापूर २०, कळंब २०, उमरगा १०, लोहारा १० आणि भूम तालुक्यातून १० खेळाडू सहभागी झाले. स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ बुद्धिबळपटू नंदकुमार सुरू यांच्या हस्ते झाले, तर बक्षीस वितरण समारंभ गटविकास अधिकारी संतोष नलावडे, श्रीसिद्धिविनायक को. ऑप. सोसायटीचे चेअरमन दिनेश कुलकर्णी, सिद्धिविनायक डिस्ट्रीक्ट को. ऑप. सोसायटीचे चेअरमन गणेश कामटे आणि सिद्धिविनायक मल्टीस्टेटचे व्हाइस चेअरमन व्यंकटेश कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या स्पर्धेसाठी विजेत्यांना एकूण ३० हजार रुपयांचे रोख पारितोषिके आणि ट्रॉफी, मेडल्स आणि स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली. स्पर्धेचे उत्कृष्ट संयोजन गजानन पाटील यांनी पार पाडले. मुख्य आर्बिटर महादेव भोरे, तांत्रिक प्रमुख गोपाळ भोसले, आर्बिटर चंद्रशेखर इंगळे आणि सिद्धिविनायक परिवारातील मार्केटिंग प्रमुख प्रशांत वाघमारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आभार प्रदर्शन जिल्हा संघटनेचे सचिव शेख जावेद यांनी केले. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील नवोदित बुद्धिबळपटूंना दर्जेदार स्पर्धात्मक व्यासपीठ मिळाले असून, पुढील वर्षी ही स्पर्धा अधिक व्यापक स्वरूपात घेण्याचा निर्धार यावेळी आयोजकांनी व्यक्त केला आहे.

या बुद्धिबळपटू विजेत्यांचा करण्यात आला सन्मान

वरिष्ठ गट:-

प्रथम-महादेव तुपे
द्वितीय-कानडे आर्णव
तृतीय-भगवान जाधव
चतुर्थ-अमोल तोडकरी
पाचवा-चंद्रकांत पवार

अंडर-१९ गट:-

प्रथम- श्रेयस लगदिवे
द्वितीय-तेजस मोरे
तृतीय-सोहम गायकवाड
चतुर्थ-गणेश घोरपडे
पाचवा-अथर्व रेड्डी

अंडर-१५ गट:-

प्रथम-श्रेयस लगदिवे
द्वितीय- श्लोक चौधरी
तृतीय-साद सय्यद
चतुर्थ-विशाखा दहिभाते
पाचवा-विराज खरात

अंडर-११ गट:-

प्रथम-प्रज्वल वाघमारे
द्वितीय-समरजित देशमुख
तृतीय-विराज धोंगडे
चतुर्थ-अर्णव जाधव
पाचवा-अपूर्वा रेड्डी

धाराशिव प्रशिक्षण केंद्र गट:-

प्रथम-विराज बुरले
द्वितीय-ओम गायकवाड
तृतीय-प्रांजल वाघमारे

  • Related Posts

    पात्र अतिक्रमण धारकांनाही आता घरकुल मिळणार

    Spread the love

    Spread the loveजागेचे पट्टे मिळवून घेण्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन धाराशिव – प्रधानमंत्री आवास योजना टप्पा -२ अंतर्गत धाराशिव जिल्ह्यात नवीन ७५ हजार घरकुल मंजूर आहेत. मात्र यातील अनेक…

    पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यात ७५ हजार नवीन घरकुल – आ. राणाजगजितसिंह पाटील

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम देशभरात सुरू झाले असून, धाराशिव जिल्ह्यासाठी ७५ हजारांहून अधिक घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे. लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्याचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *