वाहनांची फिटनेस तपासणी ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशनद्वारे होणार – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांची माहिती

Spread the love

धाराशिव :- वाहनांची फिटनेस तपासणी मनुष्यबळावर केली जात होती.मात्र आता ती पद्धत बंद होणार असून त्याऐवजी वाहनांची फिटनेस तपासणी आटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन (ATS) अत्याधुनिक यंत्राद्वारे स्वयंचलित पद्धतीने करण्यासाठी धाराशिव येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन उभारण्यात येत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी आज दिली. धाराशिव येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात वाहनांच्या फिटनेसची तपासणी करण्यासाठी ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन (ATS) चे बांधकाम नोव्हेंबर २०२४ पासून करण्यात येत आहे. यामध्ये अत्याधुनिक मशनरी बसविण्यात येणार असून स्वयंचलित मशीनच्या सहाय्याने वाहनांच्या बॉडीपासून वाहनांच्या सर्व सुरक्षा उपाय यांची संपूर्ण तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच वाहन फिटनेस तपासणी दरम्यान मानवाकडून होणाऱ्या चुका आपोआप टाळण्यास मदत होणार आहे.या सेंटरद्वारे जर वाहन फिटनेस तपासणी सर्व बाबतीत योग्य असेल तर फिटनेस सर्टिफिकेट देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.विशेष म्हणजे फक्त फिटनेस वाहनांनाच रस्त्यावर चालविण्याची परवानगी मिळत असते. त्यामुळे रस्ता सुरक्षिततेमध्ये सुधारणा होत असते.त्यामुळे या नवीन पद्धतीमध्ये अधिक पारदर्शकता असून विश्वासार्हता निर्माण करणारी असल्याचे त्यांनी सांगितले.

हे होणार फायदे
प्रदूषण जास्त करणाऱ्या वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट मिळणार नाही. त्यामुळे ती वाहने आपोआप बेकायदेशीर ठरतील.तर वाहनांची योग्य स्थिती नसेल तर त्यांना देखील फिटनेस सर्टिफिकेट मिळणार नाही त्यामुळे ती वाहने रस्त्यावर धावणारच नाहीत.तसेच प्रदूषणाचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे रस्ते अपघाताचे प्रमाण देखील घटण्यास मदत होईल. जुन्या वाहनांची संख्या कमी होऊन त्यांच्या वापरावर निर्बंध येतील. वाहनांची संख्या कमी झाल्यास काही प्रमाणात वाहतूक कोंडी देखील कमी होण्यास मदत होईल.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *