पत्रकारांनी पोलिसांसाठी मित्र आणि मार्गदर्शक व्हावे पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचे पत्रकारांना आवाहनधाराशिव जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने नूतन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचा सत्कार

Spread the love

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून चांगले काम करण्याचा उद्देश ठेवून मी आले असून, यासाठी पत्रकारांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी मित्र आणि मार्गदर्शक बनावे असे आवाहन नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी केले. पोलीस अधीक्षक म्हणून पदभार हाती घेतलेल्या रितू खोखर यांचा सत्कार पत्रकार बांधवांनी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खोखर यांनी मनमोकळ्या गप्पा मारत जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पत्रकारांच्या सहकार्याची गरज असून, पोलिसांची जिथे चूक होईल तिथे निश्चितपणे पत्रकारांनी चुका दाखवून देण्याचे देखील आवाहन केले. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो, त्यामुळे पोलीस प्रशासन म्हणून काम करताना या चौथ्या स्तंभाची वेळोवेळी गरज पडणार आहे. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखताना पोलिसांकडून काही त्रुटी होऊ शकतात, परंतु, या त्रुटी मित्र आणि मार्गदर्शक म्हणून पत्रकारांनी दाखवून दिल्यास त्याचा आम्हाला फायदा होईल असेही खोखर यावेळी म्हणाल्या. यावेळी त्यांनी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यात अंमली पदार्थांचे बेकायदेशीरपणे सेवन आणि विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तुळजापूर येथे वाहतुकीचा नवीन विभाग काढण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पोलीस अधीक्षक निवासस्थानाच्या परिसरातील वृक्षतोड केल्याच्या वृत्ताचे त्यांनी खंडन करून परिसरातील एकही वृक्ष तोडला नसून, त्यांची फक्त छाटणी केल्याचे त्यांनी सांगितले. परिसरातील काही वृक्ष मोठ्या प्रमाणावर वाढले असून, फांद्या घरावर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच डासांचा उपद्रव देखील वाढल्यामुळे झाडांची छाटणी करणे आवश्यक होते, त्याप्रमाणे झाडांची फक्त छाटणी केली असून, एकही वृक्ष तोडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचीही उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक भास्कर जिल्हा प्रतिनिधी राजाभाऊ वैद्य, लोकमदत न्यूज चॅनल तथा सा.उस्मानाबाद जिल्हा खबर संपादक अमजद सय्यद, दैनिक धाराशिव नामा संपादक विनोद बाकले, दैनिक आरंभ मराठी कार्यकारी संपादक सज्जन यादव आणि के न्यूज मराठी संपादक किरण कांबळे यांची उपस्थिती होती.

  • Related Posts

    सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत दत्तात्रय आनंदे यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरव

    Spread the love

    Spread the loveमुंबई – राज्यभरातील पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ आणि उल्लेखनीय सेवेबद्दल ओळखले जाणारे एक नाव म्हणजे श्री. सूर्यकांत दत्तात्रय आनंदे. त्यांच्याच प्रदीर्घ सेवेला आज राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, राष्ट्रपती…

    धाराशिव पोलीस दलातील आठ कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार; अनुभव कथन करताना डोळे पाणावले

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पोलीस दलात प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त होणाऱ्या आठ अधिकारी व अंमलदारांचा आज पोलीस अधीक्षक कार्यालयात एका भावपूर्ण कार्यक्रमात निरोप समारंभ संपन्न झाला. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *