
पुणे- सुभाष जगताप,सुनील टिंगरे हे राष्ट्रवादीला आता २ शहर अध्यक्ष मिळाले आहेत तर रूपाली ठोंबरे,हाजी फिरोज शेख हे २ कार्याध्यक्ष मिळाले आहेत अशी घोषणा आमदार चेतन तुपे पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या सुचने नुसार केली आहे.तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्ती पत्र दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे शहराचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष जाहीर करण्यात आले आहेत पुणे शहराचे पूर्व पुणे व पश्चिम पुणे असे दोन भाग करून प्रत्येक भागासाठी एक शहराध्यक्ष व दोन कार्याध्यक्ष अशी रचना करण्यात आली आहे.
पुणे शहराचे पूर्व पुणे यामध्ये कसबा कॅन्टोन्मेंट हडपसर व वडगाव शेरी मतदारसंघाचा समावेश करण्यात आला तर
या चार मतदारसंघाला पूर्व पुणे म्हणून संबोधन पूर्व पुण्याच्या शहराध्यक्षपदी माजी आमदार सुनील टिंगरे यांची निवड तर कार्याध्यक्षपदी श्रीमती रूपाली ठोंबरे व दुसरे कार्याध्यक्ष म्हणून हाजी फिरोज शेख यांची निवड करण्यात आली आहे.
पश्चिम पुणे, शहराच्या पश्चिम पुण्यामध्ये पर्वती, खडकवासला, कोथरूड ,व शिवाजीनगर या चार विधानसभा मतदारसंघाचा समावेशया चार मतदारसंघाला पश्चिम पुणे म्हणून संबोधून पश्चिम पुण्याच्या शहराध्यक्षपदी सुभाष जगताप यांची निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची फेरनिवड व दुसरे कार्याध्यक्ष म्हणून श्री अक्रूर कुदळे यांची निवड करण्यात आली आहे
या निवडीची घोषणा आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली व या सर्वांची नियुक्तीपत्रे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेले आहेत
अजितदादांच्या सूचनेवरून आमदार चेतन तुपे यांनी ही नावे जाहीर केली,