अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पार पाडाव्यात – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Spread the love

धाराशिव – यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात ५० लक्ष वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.१९ जुलै रोजी एकाच दिवशी २० लक्ष वृक्ष करण्याचे नियोजन केले असून वृक्ष लागवडीशी संबंधित सर्व नोडल अधिकारी व सहायक नोडल अधिकारी यांनी आपआपल्या जबाबदाऱ्या वेळेत पार पाडाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन मोहिमेच्या तयारीचा आढावा घेताना पुजार बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव,उपजिल्हाधिकारी सर्वश्री प्रवीण धरमकर,शिरीष यादव, उदयसिंह भोसले,संतोष राऊत, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक.करे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,मृदा व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रभाकर महामुनी,जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी चंद्रकांत राऊळ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्वश्री श्याम गोडभरले.सूर्यकांत भुजबळ. देवदत्त गिरी,पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता.मोमीन, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता मदने यांची प्रमुख उपस्थिती होती.

.पुजार म्हणाले,येत्या पावसाळ्यात जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.ज्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे ते ठिकाण आधी निश्चित करावे.नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात जाऊन वृक्ष लागवडीबाबत संबंधित तालुका व शहरी यंत्रणांच्या बैठका घ्याव्यात,तसेच लागवडीपूर्व कामे करण्यात यावीत.शहरी भागातील वृक्ष लागवडीसाठी खुल्या जागांची निवड करावी तसेच शहरी भागातील शाळांच्या परिसरात वृक्ष लागवड करावी.साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी.१९ जुलै रोजी ६२ हेक्टरवर २० लक्ष वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गाव पातळीवर प्रत्येक गावातून ३०० व्यक्ती या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होतील,असे सांगून श्री.पुजार म्हणाले की,६ महिन्यानंतर वृक्ष लागवड मोहिमेचा आढावा घेण्यात येणार आहे.वृक्ष लागवड करताना कोणत्या ठिकाणी कोणते वृक्ष लावावे हे निश्चित करावे.येत्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक होऊन भूजल पातळी वाढवण्यासाठी जलतारा प्रकल्प मोठ्या प्रमाणात हाती घ्यावेत,शेतकऱ्यांना शेतात जाणे सोयीचे व्हावे तसेच शेतातील उत्पादित माल घरी किंवा बाजारपेठेत घेऊन जाणे सोयीचे व्हावे यासाठी अतिक्रमित रस्ते व पानंद रस्ते मोकळे करावे.पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची कामे वेगाने पूर्ण करावीत, असेही निर्देश श्री.पुजार यांनी दिले.

या बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी,सर्व तहसीलदार,सर्व गटविकास अधिकारी ऑनलाईन तर संबंधित यंत्रणांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

  • Related Posts

    एसटीचे खासगीकरण होणार नाही – परिवहन मंत्री सरनाईक यांची ग्वाही

    Spread the love

    Spread the loveराज्य शासनाचा अंगीकृत सार्वजनिक उपक्रम असलेली एसटी महामंडळ ही सुमारे ८३ हजार कर्मचाऱ्यांची ‘मातृसंस्था’ असून तिचे खासगीकरण होणार नाही, अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप…

    लोहटा पूर्व गावास महसुली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा! महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक , आमदार कैलास पाटील यांची माहिती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ता. 14: कळंब तालुक्यातील लोहटा (पूर्व) गावाला महसुली ओळख मिळवण्यासाठी लढा द्यावा लागला होता अखेर या गावास आता महसूली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आमदार कैलास…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *