धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी — शाहूराज प्रतिष्ठानच्या उपक्रमास मान्यवरांची उपस्थिती

Spread the love

धाराशिव: स्वराज्याचे रक्षण करणारे, शौर्य, धैर्य आणि बुद्धीमत्ता यांचा अनोखा संगम असलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शाहूराज प्रतिष्ठान यांच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली.

या निमित्ताने महाराजांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, बहुजनांचे नेते धनंजय नाना शिंगाडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष शहर संघटक कडवट मावळा प्रशांत उर्फ बापू साळुंके,धाराशिव जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. जयंतजी जगदाळे, प्राचार्य चव्हाण सर, युवासेना उपजिल्हाप्रमुख विजय राठोड, अ‍ॅड. शुभम गाडे, युवासेना तालुकाप्रमुख प्रशांत (तुकाराम) कोळी, आणि संस्थापक अध्यक्ष युवराज तात्या राठोड आदींच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमाच्या आयोजनात जयंती अध्यक्ष कृष्णा पाटील, उपाध्यक्ष प्रतीक कदम, सचिव प्रेम रणखांब, मिरवणूक प्रमुख ओम जगताप, तसेच मंडळाचे कार्यकर्ते रोहन नलवडे, महेश चौगुले, श्री भोरे, साईराज कदम, यश कदम, सुनील भोसले, प्रतीक मेंढेकर, सागर पवार, सोहम खांडवे, अरुण राठोड, मिथुन राठोड, सुयोग साळुंखे, रोहन खोत यांचे विशेष योगदान लाभले.

शहरामध्ये महाराजांच्या कार्याची उजळणी करत, त्यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून झाला. शाहूराज प्रतिष्ठानच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, अशा उपक्रमातून नवतरुणांना इतिहासाची आणि स्वाभिमानाची जाणीव होणे आवश्यक आहे, असे मतही यावेळी अनेकांनी व्यक्त केले.

  • Related Posts

    धाराशिव – वीररत्न शिवाजी काशीद व जिवाजी महाले प्रतिष्ठान उपळे (मा) ता.जि. धाराशिव यांच्यावतीने वीररत्न शिवाजी काशीद यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली.

    Spread the love

    Spread the loveतसेच शिवा काशिद जयंती निमित्त व गयाबाई श्रीमंत पवार यांच्या स्मरणार्थ स्वधार मतिमंद मुलीचे बालग्रह येथे फळ वाटप करण्यात आले.

    लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी गणेश शिवाजी सोनटक्के यांची निवड करण्यात आली. नवीन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *