जिल्हा न्यायालयात विधीज्ञ मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी – ॲड.जयप्रकाश साळुंखे यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान

Spread the love

धाराशिव – जिल्हा न्यायालयाच्या विधीज्ञ मंडळाच्या कक्षामध्ये आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात व अत्यंत आदरभावाने साजरी करण्यात आली.

या वेळी विधीज्ञ मंडळाचे जेष्ठ सदस्य ॲड.जयप्रकाश साळुंखे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यावर सखोल अभ्यासलेले, अभ्यासपूर्ण व उत्स्फूर्त व्याख्यान दिले. त्यांच्या व्याख्यानाला उपस्थित विधिज्ञांनी भरभरून प्रतिसाद दिला.

या वेळी मा.अध्यक्ष ॲड.निलेश बारखडे पाटील,मा.उपाध्यक्ष ॲड.नितीन लोमटे,उपाध्यक्ष ॲड.प्रमोद वाकुरे,कोषाध्यक्ष ॲड.एन. डी. पाटील,महिला प्रतिनिधी ॲड.रणखांब मॅडम ॲड.हेमंत शेरकर,ॲड.रमेश सूर्यवंशी,ॲड. अजय वाघाळे,ॲड.अविनाश गरड,ॲड.आवारे,ॲड.घोगरे महाराज इत्यादींसह अनेक विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचा उद्देश केवळ महाराजांची जयंती साजरी करणे हा नसून, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन न्यायव्यवस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येकाने राष्ट्रहिताच्या मूल्यांशी बांधिलकी ठेवावी हा होता. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

  • Related Posts

    छत्रपती संभाजी महाराजांनाजिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज १४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…

    धाराशिव – वीररत्न शिवाजी काशीद व जिवाजी महाले प्रतिष्ठान उपळे (मा) ता.जि. धाराशिव यांच्यावतीने वीररत्न शिवाजी काशीद यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली.

    Spread the love

    Spread the loveतसेच शिवा काशिद जयंती निमित्त व गयाबाई श्रीमंत पवार यांच्या स्मरणार्थ स्वधार मतिमंद मुलीचे बालग्रह येथे फळ वाटप करण्यात आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *