
धाराशिव – उमरगा तालुक्यातील मूळचे रहिवासी भगवान देवकते यांची धाराशिव जिल्हा सह संपर्कप्रमुख पदावर निवड करण्यात आली आहे. पक्षाशी निष्ठा राखत, सातत्यपूर्ण कार्य आणि नेतृत्वावर दाखविलेल्या विश्वासाची दखल घेत पक्षाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
या निवडीचे पत्र पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्या अधिकृत स्वाक्षरीने देवकते यांना प्रदान करण्यात आले असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. देवकते यांनी आजपर्यंत पक्षाच्या विविध स्तरांवर निष्ठेने आणि संयमाने कार्य केले आहे. पक्षाच्या अडचणीच्या काळातही त्यांनी आपल्या कामातून निष्ठा आणि सेवा हे मूल्य जपले आहे.
देवकते यांच्या या निवडीनंतर धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या निवडीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विविध ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
आगामी काळात देवकते यांच्याकडे जिल्ह्यातील पक्षसंघटना अधिक बळकट करणे, नव्या कार्यकर्त्यांना संघटनेत जोडणे, तसेच पक्षाचा जनतेशी असलेला संवाद अधिक प्रभावीपणे वाढवणे यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या राहणार आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यशैलीचा उपयोग पक्ष संघटनेच्या मजबुतीसाठी कसा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
या निवडीमुळे उमरगा तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली असून, देवकते यांच्या नेतृत्वात पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.