पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तृत्तीयपंथी देवांशी काकडेच्या आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन

Spread the love

धाराशिव – 1 मे महाराष्ट्र स्थापना दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून तृत्तीयपंथी देवांशी काकडेकडून संचलित आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलिस अधिक्षक संजय जाधव, अपर पोलिस अधिक्षक अशफत आमना, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, उपविभागीय अधिकारी अरुणा गायकवाड, समाजकल्याणचे सहायक आयुक्त बाबासाहेब अरवत, तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांच्यासह महसुल विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
आपले सरकार सेवा केंद्रातून नागरिकांना विविध शासकीय योजना, उत्तन्न, जात, रहिवासी, वय,अधिवास व राष्ट्रीयत्व यासह अन्य प्रमाणपत्रे आणि अर्ज प्रक्रिया यासाठी या केंद्रातून मदत करण्यात येणार आहे, जेणेकरुन नागरिकांना सरकारी कार्यालयात वारंवार जावे लागणार नाही. या केंद्रामुळे तृत्तीयपंथी देवांशी काकडे यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *