पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार

Spread the love

धाराशिव – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आज महाराष्‍ट्र दिन कार्यक्रमाच्या ध्वजारोहणानंतर विविध क्षेत्रातील व्यक्तीचा व अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक संजय जाधव,अपर जिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील,अपर पोलीस अधीक्षक अफशत आमना,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड, शिरीष यादव, संतोष राऊत, उदयसिंह भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जून झाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सन्मानित करण्‍यात आलेल्या व्यक्तीमध्‍ये दिवंगत स्वातंत्र्य सैनिक शरणप्पा रेवण्णा बेडजिरगे यांच्या पत्नी महादेवी बेडजिरगे, 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातून प्रथम क्रमांक धाराशिव जिल्हा परिषदेला मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, आदर्श तलाठी पुरस्कार तहसील कार्यालय परंडा येथील तलाठी ज्ञानेश्वर गुळमिरे, पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह विशेष कामगिरीबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपधिक्षक सिध्दराम म्हेत्रे, पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम, शिक्षण विभागातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व केंद्रीय शाळा कसबे तडवळे येथील मुख्याध्यापक व शिक्षक, विद्यार्थी, सन 2024-25 जिल्हा युवा पुरस्कार लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील विकास लोभे, शिंगोली येथील अस्मिता शिंदे, वाशी तालुक्यातील गोजवाडा येथील श्रीराम बहूद्देशीय सामाजिक संस्था यांना, आरोग्य विभागाचा जिल्हा रुग्णालय अंतर्गत सन 2024-25 या वर्षातील कामातील मुल्यांकनामध्ये राज्यस्तरावरील द्वित्तीय क्रमांकाचा राष्ट्रीय अंधत्व निवारण यामध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल जिल्हा रुग्णालयातील नेत्ररोग तज्ञ डॉ.मुस्तफा पल्ला, राज्यात ग्रामीण भागात सर्वात जास्त प्रसुती करणारे स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर येथील प्रकल्प अधिकारी रेमश जोशी, वार्षिक मुल्यांकनामध्ये राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.स्मिता सरोदे-गवळी यांना, प्राथमिक आरोग्य केंद्र समुद्रवाणीच्या आरोग्य सहाय्यिका ए.एस.पांढरे, प्राथमिक आरोग्य केंद्र ईटकूरच्या आरोग्य सेविका श्रीमती कासार, प्राथमिक आरोग्य केंद्र ईटच्या आशा कार्यकर्ती मंगल चव्हाण, परंडा तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे यांनी 263 हेक्टरवर मग्रारोहयो येाजनेतून सर्वाधिक फळबाग लागवड केल्याबद्दल, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या कलम 20 च्या पोटकलम 3 व 5 अनुषंगाने द्वित्तीय अपील प्राधिकारी जिल्हा विशेष शाखेचे पोलिस अमोद भुजबळ चारित्र पडताळणी पासपोर्ट आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे व रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.तानाजी लाकाळ यांना सन्मानित करण्यात आले. अवयव दान चळवळीसाठी काम करणारे उमरगा येथील पृथ्वी वरवटे व त्यांच्या एकूण सहकारी, एकूरगा येथील पोलीस पाटील महेश शंकर माणिकराव पाटील यांना पोलिस पाटील पुरस्कार, जिल्हा प्रशासन व सिरेंटिका रिन्यूएबल्स कंपनी मार्फत जैन मुनी कुलभूषण देशभुषण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाशी तालुक्यातील अनिकेत दतात्रय शिंगाटे शिवम जी ढगे, अर्थव अमर गुरसाली, पृथ्वीराज डी.मारकड, वेदांत बी. पाटील यांना प्रातिनिधिक स्वरुपात मोफत प्रशिक्षणासाठी पत्र वाटप, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संस्था यांना सन्मानित करण्यात आले.

  • Related Posts

    सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत दत्तात्रय आनंदे यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरव

    Spread the love

    Spread the loveमुंबई – राज्यभरातील पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ आणि उल्लेखनीय सेवेबद्दल ओळखले जाणारे एक नाव म्हणजे श्री. सूर्यकांत दत्तात्रय आनंदे. त्यांच्याच प्रदीर्घ सेवेला आज राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, राष्ट्रपती…

    पत्रकारांनी पोलिसांसाठी मित्र आणि मार्गदर्शक व्हावे पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचे पत्रकारांना आवाहनधाराशिव जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने नूतन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचा सत्कार

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – धाराशिव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून चांगले काम करण्याचा उद्देश ठेवून मी आले असून, यासाठी पत्रकारांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी मित्र आणि मार्गदर्शक बनावे असे आवाहन नवनियुक्त…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *