
धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्था, सिद्धिविनायक परिवार, तुळजापूर नगरीचे माजी नगरसेवक व वडगाव (सि) चे माजी उपसरपंच यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
धाराशिव जिल्हा विधिज्ञ मंडळाचे नूतन अध्यक्ष ॲड .अमोल वरुडकर, उपाध्यक्ष ॲड.नितीन लोमटे, ॲड नारायण पाटील, महिला प्रतिनिधी ॲड उज्वला इंगळे, सहसचिव ॲड भाग्यश्री रणखांब या पदाधिकाऱ्यांचा सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, वडगाव (सि) चे माजी उपसरपंच प्रमोद पाटील, प्रशांत साळुंखे, पांडुरंग पाटील, प्रशांत पाटील, माणिक पाटील तसेच जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन शरद आबा मुंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवदास कांबळे, ॲड नितीन भोसले, ॲड कैलास बागल, ॲड विजय माने, ॲड मनोज शेरकर, ॲड फुलचंद काकडे,ॲड शरद गोरे, ॲड,बाळासाहेब एकंडे, ॲड तानाजी तामाने यांच्यासह वकील उपस्थित होते.