शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने शहीद दिवस तसेच क्रांतिसूर्य आण्णासाहेब पाटील पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन सभा संपन्न

Spread the love

धाराशिव – रविवार दि.23/03/2025 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने दि.23 मार्च 1931 रोजी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या विवेकी क्रांतिकारी भगतसिंग आणि त्यांचे दोन क्रांतिकारी साथीदार सुखदेव थापर आणि शिवराम हरी राजगुरू यांना सँडल्सच्या वधाच्या कारणाने फाशीची शिक्षा देण्यात आली होती. भारत मातेच्या या महान सपूतांच्या हौतात्म्याने भारतीयांच्या मध्ये क्रांतीची ज्योत प्रज्वलित झाली होती.या हौतात्म्य पत्करलेल्या महान क्रांतिकारकांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.तसेच दिनांक 23 मार्च 1982 रोजी मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही तर मी उद्याचा सूर्य पाहणार नाही अशी पाच लाख लोकांसमोर शपथ घेऊन ती पूर्ण करणारे, मराठा महासंघाचे संस्थापक, लाखो माथाडी कामगारांचे कैवारी, मराठा आरक्षणाचे संकल्पक, मराठ्यांचे क्रांतीसुर्य स्वं. आण्णासाहेब पाटील यांनी समाजासाठी बलिदान दिले काही अण्णासाहेब पाटलांच्या बलिदानाच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी समितीचे शहर संघटक अविनाश रणखांब यांनी क्रांतिसूर्य अण्णासाहेब पाटील यांच्या जीवन कार्याविषयी संपूर्ण माहिती त्यांना दिली. अण्णासाहेब पाटलांचे मराठा आरक्षण आणि माथाडी कामगारांसाठी केलेले अतुलनीय कार्य त्यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले. शाहिद भगतसिंग, राजगुरू ,सुखदेव यांच्याविषयी शहर समिती सोशल मीडिया प्रमुख ऋषिकेश काळे यांनी संपूर्ण सँडल्स वधाचा घटनाक्रम तसेच भगतसिंगाचे संपूर्ण जीवन प्रवास त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व ओघवत्या वाणीने उपस्थितांना सांगून अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी अभिवादन सभेसाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ धाराशिवचे जिल्हा समनव्यक श्री.बारुंगुळे साहेब ,श्री घुले साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवचे जिल्हाध्यक्ष श्री गौरव बागल, कार्याध्यक्ष श्री सुनील मिसाळ, शहर उपाध्यक्ष श्री आकाश भोसले, योगेश आतकरे, अमोल साळुंके, दत्तात्रेय साळुंके, शुभम लोकरे, ओमकार शितोळे,ज्योतिराम काळे, ज्ञानेश्वर नलावडे, भैरवनाथ रणखांब व इतर पदाधिकारी तसेच बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे माजी सचिव श्री दत्तात्रय साळुंखे यांनी तर आभार प्रदर्शन श्री सुनील मिसाळ यांनी केले.

  • Related Posts

    छत्रपती संभाजी महाराजांनाजिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज १४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…

    धाराशिव – वीररत्न शिवाजी काशीद व जिवाजी महाले प्रतिष्ठान उपळे (मा) ता.जि. धाराशिव यांच्यावतीने वीररत्न शिवाजी काशीद यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली.

    Spread the love

    Spread the loveतसेच शिवा काशिद जयंती निमित्त व गयाबाई श्रीमंत पवार यांच्या स्मरणार्थ स्वधार मतिमंद मुलीचे बालग्रह येथे फळ वाटप करण्यात आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *