दिव्यांग व्यक्तींना हरित ऊर्जेवरील मोबाईल दुकानांचे होणार मोफत वाटप १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले

Spread the love

धाराशिव, दि.8 दिव्यांग व्यक्तींसाठी स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणारे पर्यावरणस्नेही फिरते दुकान ( मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी योजना लागू केली आहे.या योजनेस सन २०२४-२५ करिता १० जून २०१९ रोजीच्या शासनाने मान्यता देण्यात आली आहे.त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून केली जात आहे.

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या योजनेस राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.ही मागणी लक्षात घेता,गरजू दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्जदार नाव नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.इच्छुक अर्जदार https://register.mshfdc.co.in या पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतात.अर्ज भरण्याची अंतिम मुदत १० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत आहे.

राज्य सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक योजना राबवल्या असल्या तरी,ही योजना विशेष महत्त्वाची ठरणार आहे,कारण ती आर्थिक स्वायत्ततेबरोबरच पर्यावरणस्नेही उपजीविकेचा मार्ग खुला करते.इच्छुक लाभार्थ्यांनी वेळेत अर्ज करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ धाराशिवचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

  • Related Posts

    जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रयत्नआधार नोंदणीच्या माध्यमातूनमुकबधिर बालकाचे कुटुंब शोधण्यात यश

    Spread the love

    Spread the loveअकोला – : जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि आधार नोंदणी प्रक्रियेचा प्रभावी वापर करून एका मुकबधिर हरविलेल्या बालकाचे कुटुंब शोधण्यात यश आले.बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनात ही…

    फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीकडून उपवर्गीकरण (अबकड) विरोधी मोर्चात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जिल्हाधिकारी यांना निवेदन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : आरक्षण उपवर्गीकरण (अबकड) विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात फुले,शाहू, आंबेडकर उद्यान कृती समितीने सक्रीय सहभाग घेतला.यावेळी समितीच्या वतीने मोर्चात सहभागी झालेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *