वरुडा रोडला जोडणारा डी.पी. रोड पुर्ववत चालू ठेवा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Spread the love

धाराशिव शहरातील सर्व्हे नं. 153 मधून बँक कॉलनी व अन्य नागरी भागांना जोडणारा रस्ता संदर्भात नागरीकांच्या मागणीच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये सदर रस्ता पुर्वीप्रमाणे चालू ठेवणेसंदर्भात पोलीस अधिक्षक धाराशिव मुख्याधिकारी, नगर पालीका, धाराशिव, जिल्हा प्रशासन अधिकारी नगर रचनाकार यांच्या समवेत नागरीकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीस आमदार कैलास पाटील, मा. नगराध्यक्ष श्री. नंदुभैय्या निंबाळकर उपस्थीत होते. पोलीस प्रशासनाच्या ताब्यातील जमीनीमधून सदर रस्ता जात असून पोलीस प्रशासन हा रस्ता बंद करणार असल्याची माहिती सामाजिक प्रसार माध्यमातून व नागरीकांच्या निवेदनाव्दारे मिळाल्यानंतर नागरीकांची होणारी गैरसोय लक्षात घेता सदर रस्ता पुर्ववत प्रमाणे चालू ठेवणेबाबत या बैठकीमध्ये सुचना देण्यात आल्या. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधिक्षक संजय जाधव, मुख्याधिकारी नगर परीषद वसुधा फड, जिल्हा प्रशासन अधिकारी नगर रचनाकार, राजाभाऊ पवार, आदीसह अनेक नागरीक उपस्थीत होते.

  • Related Posts

    जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रयत्नआधार नोंदणीच्या माध्यमातूनमुकबधिर बालकाचे कुटुंब शोधण्यात यश

    Spread the love

    Spread the loveअकोला – : जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि आधार नोंदणी प्रक्रियेचा प्रभावी वापर करून एका मुकबधिर हरविलेल्या बालकाचे कुटुंब शोधण्यात यश आले.बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनात ही…

    फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीकडून उपवर्गीकरण (अबकड) विरोधी मोर्चात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जिल्हाधिकारी यांना निवेदन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : आरक्षण उपवर्गीकरण (अबकड) विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात फुले,शाहू, आंबेडकर उद्यान कृती समितीने सक्रीय सहभाग घेतला.यावेळी समितीच्या वतीने मोर्चात सहभागी झालेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *