१२ व १३ फेब्रुवारी दरम्यान धाराशिव येथेविभागस्तरीय क्रीडा व तंत्रप्रदर्शन स्पर्धां

Spread the love

धाराशिव – व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (औ. प्र.) प्रशिक्षणार्थ्यांसाठी विभागीय क्रिडा व तंत्रप्रदर्शन स्पर्धांचे आयोजन धाराशिव येथे करण्यात आले आहे. या स्पर्धा तुळजाभवानी स्टेडियम, धाराशिव येथे १२ व १३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणार आहे.

या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन व समारोप समारंभासाठी मान्यवर उपस्थित राहणार असून,प्रमुख पाहुणे म्हणून सहसंचालक,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण,छत्रपती संभाजीनगर तर अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी, धाराशिव हे उपस्थित राहणार आहेत. प्रशिक्षणार्थ्यांमध्ये सुप्त कौशल्यांना चालना देण्यासाठी आणि त्यांच्यातील स्पर्धात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.व्हॉलीबॉल,क्रिकेट आणि धावण्याच्या स्पर्धा तुळजाभवानी स्टेडियम,धाराशिव येथे होतील. खो-खो स्पर्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय मैदान,डीआयसी रोड,धाराशिव येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धा तसेच तंत्रप्रदर्शन स्पर्धा औद्योगिक प्रशिक्षण संस्था,धाराशिव येथे आयोजित करण्यात येणार आहेत.या विभागीय स्पर्धांमध्ये अनेक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थी सहभागी होणार असून, त्यांना आपली गुणवत्ता सादर करण्याची संधी मिळणार आहे.या स्पर्धांमधून खेळाडूंच्या कौशल्याला वाव मिळेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल.

स्पर्धांचा समारोप समारंभ दि.१३ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता तुळजाभवानी स्टेडियम, धाराशिव येथे होणार आहे.स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

सर्व क्रिडाप्रेमींनी या स्पर्धांचा आनंद घ्यावा,असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रविण औताडे यांनी केले आहे.

  • Related Posts

    सोयाबीनवरील शंखी गोगलगाय, पैसा/वाणी किडीचा वाढता प्रादुर्भाव ; सामूहिक नियंत्रणासाठी कृषी विभागाचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – चालू खरीप हंगामात मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी व उगवण पूर्ण झाली आहे.मात्र, सध्या जिल्ह्यातील काही भागांत शंखी गोगलगाय तसेच पैसा/वाणी (Millipede) किडीचा…

    ‘पावसाचा प्रत्येक थेंब पिकासाठी वापरा’ ; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बीबीएफ यंत्र चालवत केली सोयाबीन पेरणी,तूरही टोकण पद्धतीने लावली

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – बदलते हवामान,कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड… अशा अनिश्चित परिस्थितीतही सोयाबीनचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रुंद सरी-वरंबा (BBF) तंत्रज्ञान हा सर्वोत्तम पर्याय असल्याचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *