घाटंग्री आश्रम शाळेत नवीन कायद्याविषयी जनजागृती

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने जुन्या कायद्याच्या कलमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेले आहेत. त्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी धाराशिव तालुक्यातील घाटंग्री येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन कायद्याविषयी माहिती दि.५ फेब्रुवारी रोजी देण्यात आली.

केंद्र सरकारने कायदे व कलमामध्ये अनेक अमुलाग्र बदल केलेले आहेत. त्या कायद्याची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी १०० दिवसांचा जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रमाचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार घाटंग्री येथील श्री व्यंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील इयत्ता १० वी ते १२ वी मधील विद्यार्थ्यांना नवीन भारतीय न्याय संहिता कायद्याबाबत ऍड. विमल एस. म्हैत्रे, सहाय्यक न्याय रक्षक ऍड एम.एस. शिरुरे, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय यु.एम. हाके, महिला पोलीस एम.पी. लोखंडे, पोलीस अंमलदार गणेश ए. खैरे यांनी नवीन भारतीय न्याय संहिता (BSN) कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी.पी. माने, शिक्षक एस जी इंगळे, बी आर जाधव, एस के पाटील, एम व्ही आमलपुरे, एम आर मुलाणी एम, एस पी पवार, ए बी शेजाळ, अमोघे, एम जी राठोड, सी एस चामे, ए.एस. कुलकर्णी, जे.व्ही. घेरडी, वाय पी मंडलीक, एस एम शिनगारे, शिक्षकेत्तर कर्मचारी डी जी कांबळे, तेजस माळी, गेंड, बी बी कांबळे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    सोलापूरात ४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ; ४९ ज्येष्ठ वकिलांचा सहभाग

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – दि. ३० जुलै : मुख्य मध्यस्थी देखरेख समिती, मुंबई उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४० तासांच्या मध्यस्थी…

    गरजूंसाठी मोफत व सुलभ न्याय मिळवून देणे हेच विधी सेवा प्राधिकरणाचे ध्येय ,सचिव भाग्यश्री पाटील

    Spread the love

    Spread the loveसामाजिक समता सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेशांचे वितरण धाराशिव -: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *