मुंबई मंत्रालयात पत्रकारितेच्या नव्या क्षितिजांची ओळख

Spread the love

मुंबई -: दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारितेच्या 2023/2024 या बॅचचे पदवी ग्रहण करणाऱ्या पत्रकारांसाठी एक अभिमानास्पद आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रम २३ जानेवारी रोजी मुंबई मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागात पार पडला. या ऐतिहासिक ठिकाणी उपस्थित राहून 51 विद्यार्थ्यांना शासनाच्या प्रत्यक्ष कामकाजाची थेट ओळख झाली.

कार्यक्रमात जनसंपर्क अधिकारी कार्यालय मंत्रालय मुंबई संचालक हेमराज बागुल आणि प्रभारी संचालक दयानंद कांबळे यांनी पत्रकारितेचे महत्व, त्यातील विविध पैलू आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग यावर सखोल मार्गदर्शन केले.

संचालक हेमराज बागुल यांचे मार्गदर्शन:
“पत्रकारिता ही फक्त एक विषय नसून ती समाजाला जाणून घेण्याचा आणि संवाद साधण्याचा दृष्टिकोन आहे,” असे बागुल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. त्यांनी पत्रकारितेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सत्यता आणि कल्पकतेचा उपयोग कसा करावा यावर भर दिला.

प्रभारी संचालक दयानंद कांबळे यांचा सल्ला:
“बातमी केवळ लिहिण्यासाठी नसून तिच्या सत्यतेची पडताळणी आणि सखोल पार्श्वभूमी समजणे महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. शोधपत्रकारितेत संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांना वास्तववादी व निष्पक्ष राहण्याचा सल्ला दिला.

मुंबई मंत्रालयाची भव्यता आणि शिकण्याची संधी:
मंत्रालयातील या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना शासन-जनता संवाद, लोककल्याणकारी योजना, तसेच पत्रकारांसाठी असणारे योजना , मिळणारे लाभ, अधी स्वीकृती तसेच वृत्तपत्रासाठी मिळणाऱ्या जाहिराती , पत्रकार संरक्षण आणि हल्ला विरोधी कायदे इ,माहिती व जनसंपर्क विभागाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची जवळून ओळख झाली. विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव एक अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरला.

पत्रकारितेसाठी प्रेरणादायी पाऊल:
मुंबई मंत्रालयात आयोजित हा उपक्रम पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरला असून त्यांच्या व्यावसायिक जीवनासाठी एक ठोस पाया घालणारा आहे. मंत्रालयाच्या भव्य वास्तूत शिकण्याचा अनुभव हा त्यांच्यासाठी एक संस्मरणीय क्षण ठरला आहे.

ही कार्यशाळा पत्रकारिता क्षेत्रातील नवोदितांसाठी अभिमानाची बाब असून त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत प्रेरणादायी ठरली आहे.

  • Related Posts

    तगर भूमी जेतवन बुद्ध विहारात वर्षावास महोत्सवाचे आयोजन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्षावास निमित्त निसर्गाच्या सानिध्यात तगर भुमी जेतवन बुद्ध विहार,गडदेवदरी परिसर,धाराशिव येथे वर्षावास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.मौजे गडदेवदरी घाटंग्री परिसर ता.जि.धाराशिव येथे तीन…

    ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

    Spread the love

    Spread the loveईद-ए-मिलाद निमित्त नगरसेवक अझहर मुजावरांचा उपक्रम; एसीएम ग्रुपच्या रक्तदान शिबिरात २००-३०० युवकांचा सहभाग धाराशिव – “पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.व.)” यांच्या जन्मदिनी साजरा केला जाणारा ईद-ए-मिलाद हा मुस्लिम बांधवांसाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *