तामलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेटएमआयडीसी संदर्भात मनोज जरांगे यांचा जिल्हाधिकारी यांना फोन

Spread the love

आंतरवली सराटी – तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे होणाऱ्या नियोजित एमआयडीसी संदर्भात शेतकऱ्यांच्या वाहीक बागायती जमीनी बळजबरीने घेत असल्याने तामलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने दि १८ रोजी आंतरवली सराटी जाऊन भेट घेतली व शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या यावर मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी यांना फोन करून याबाबत विचारले.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील नियोजित एमआयडीसी साठी उद्योजक व काही शेतकर्यांची पडीक जमीन सोडून जवळील अनेक शेतकऱ्यांच्या वाहीक व बागायती जमीनी घेण्याचा घाट घातला जात असुश ई मोजणी प्रणालीच्या माध्यमातून मोजणीच्या परस्पर नोंदी घेतल्या व तलाठी सज्जा तामलवाडी यांच्या वतीने शनिवार सुट्टी असताना नोटीस देण्यात येत असल्याने तामलवाडी येथील शेतकर्यांनी दि.१८ रोजी आंतरवली सराटी येथे जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सर्व कागदपत्रे दाखवली व जमीनी वाचवण्याची मागणी केली. यावर मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिव येथील जिल्हाधिकारी साहेबांना फोन करून शेतकर्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास सांगितले. मनोज दादांशी सकारात्मक चर्चा झाल्याने शेतकरी आता पुढील दिशा ठरवणार असल्याचे दिसून येत आहे.

  • Related Posts

    तगर भूमी जेतवन बुद्ध विहारात वर्षावास महोत्सवाचे आयोजन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्षावास निमित्त निसर्गाच्या सानिध्यात तगर भुमी जेतवन बुद्ध विहार,गडदेवदरी परिसर,धाराशिव येथे वर्षावास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.मौजे गडदेवदरी घाटंग्री परिसर ता.जि.धाराशिव येथे तीन…

    ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

    Spread the love

    Spread the loveईद-ए-मिलाद निमित्त नगरसेवक अझहर मुजावरांचा उपक्रम; एसीएम ग्रुपच्या रक्तदान शिबिरात २००-३०० युवकांचा सहभाग धाराशिव – “पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.व.)” यांच्या जन्मदिनी साजरा केला जाणारा ईद-ए-मिलाद हा मुस्लिम बांधवांसाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *