धाराशिव महामार्ग पोलिसांनी वाहतूक नियमांची केली जनजागृती

Spread the love

धाराशिव  – रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत धाराशिव महामार्ग हद्दीमधील धाराशिव साखर कारखाना व एस पी शुगर कारखाना कारखान्यास ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासह वाहनांना सुरक्षेसाठी रिफ्लेक्टर दि.१८ जानेवारी रोजी बसविण्यात आले.
रस्ता सुरक्षा अभियान दि.१ ते ३१ जानेवारी २०२५ अंतर्गत महाराष्ट्र राज्य अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांच्या मार्गदर्शनाखाली व महामार्ग सुरक्षा पथक छत्रपती संभाजीनगर विभागाच्या पोलीस अधीक्षक व पोलीस उपाधीक्षक यांच्या सुचनेनुसार महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव हद्दीमधील धाराशिव सहकारी साखर कारखाना व एस.पी. शुगर ऍण्ड ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड येथे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, बैलगाडी व ट्रक चालक यांना रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत रस्ते वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती करून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रेडियम व रिफ्लेक्टर लावण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त दोन्ही कारखान्यांचे अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांसह धाराशिव येथील महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी निशिकांत शिंदे व पोहवा खराडे, वाडकर, तोडकर, फंड, कलशेट्टी, दहीहंडे व बारकुल आदी उपस्थित होते.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *