कुंभमेळ्यात धार्मिक परंपरेचे दर्शन घडविण्यासाठी‘महाकुंभा’ची निर्मिती करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Spread the love

मुंबई, – : नाशिक –त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडावे, यासाठी नाशिकजवळील भागात एक मोठे महाकुंभ तयार करावे. या महाकुंभामध्ये देशातील तसेच राज्यातील मंदिरे, तीर्थक्षेत्रे, सांस्कृतिक वारशाचे भाविकांना दर्शन घेता येईल, असे मोठे संमेलन केंद्र (कन्व्हेन्शन सेंटर) उभारावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्या.

सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पूर्वचर्चा तसेच तयारीसंदर्भात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी कुंभमेळ्यातील वाहतूक व्यवस्था, गर्दीचे नियोजन, साधुग्राम, नदी आणि उपनद्यांचे शुद्धीकरण, पायाभूत सुविधा तसेच इतर अनुषंगीक विकास कामे आदींबाबतचा आढावा घेतला.

नाशिकला जागतिक पटलावर आणण्यासाठी, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कुंभमेळ्याचे ब्रॅण्डींग करण्याचे निर्देश देऊन मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, नाशिक – त्र्यंबकेश्वर रीलिजियस कॉरीडॉरची निर्मिती करून नाशिक ‘रीलिजिअस हब’ म्हणून विकसित करावे. प्रयागराजच्या धर्तीवर सुरक्षित कुंभमेळा होण्यासाठी नियोजन करावे. गोदावरी नदीकाठ विकासासाठी प्रोत्साहन द्यावे. नाशिक येथील प्रमुख मंदिरांच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी. नाशिक येथे साधुग्रामकरिता अतिरिक्त जमिनीची आवश्यकता असल्याने तेथील जमिन संपादित करण्यात यावी. येथे नगररचना परियोजन करून हस्तांतरणीय विकास हक्क स्थापित करून ते नगरपालिकेकडे हस्तांतरीत करावे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी अतिक्रमण आहेत, अशा ठिकाणची अतिक्रमण तत्काळ हटवावीत, अशाही सूचना त्यांनी केल्या.

या कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून पर्यटक दर्शनसाठी येत असतात. पर्यटक तसेच भाविकांच्या सोयीसाठी नाशिक येथे 8 ते 10 हेलिपॅड तयार करण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समृद्धी महामार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी इगतपुरी ते नाशिक हा मार्ग प्रशस्त करून नाशिक शहराला जोडणाऱ्या सर्व मार्गांचे क्राँक्रीटीकीकरण तसेच रूंदीकरण करण्यात यावे. जे मार्ग 2027 पर्यंत बांधणे शक्‌य आहे, असेच बांधकाम हाती घेण्यात यावे. इगतपुरी ते त्र्यंबकेश्वर हा रस्ता चारपदरी करण्यात यावा. वाढवण, मुंबई, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर येथून नाशिककडे येणारे रस्ते तसेच रिंग रोड आदी रस्ते अद्ययावत करण्यात यावे. नागरिक तसेच भाविकांच्या सुविधेसाठी राम काल पथ बरोबरच त्र्यंबकेश्वर येथे रीलिजिअस कॉरीडॉर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केल्या.

या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात पोलीस विभागाकडून आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी पोलीसांच्या निवासाची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर जागोजागी लागणारे सीसीटीव्ही, बॅरिकेंटींग, सार्वजनिक ध्वनिक्षेपण यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ज्या अडचणी येत असतील, त्या सोडविण्यात याव्यात. साधुग्रामकरिता संपादित केलेल्या जागेवर वृक्षतोड न करता साधुंच्या निवासाची व्यवस्था करावी. कुंभ परिसरात पाणी स्वच्छ राहील, याची विशेष दक्षता घ्यावी. मुबलक प्रमाणात प्रसाधन गृहे तयार करण्यात यावीत. जलपर्णीबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करा. तसेच कुंभमेळ्यादरम्यान कुठेही चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केल्या.

या बैठकीस जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव गोविंदराज, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सविव मनीषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी तसेच नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच अधिकारी उपस्थित होते.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *