मुंबई, पुण्यासह राज्यभरात पुन्हा बाईक टॅक्सी सुरु होणार; सरकारने कायदाच बनविला

Spread the love

पुणे : मागील काही महिन्यांपूर्वी मुंबई, पुण्यासारख्या शहरात बाईक टॅक्सीसेवा काही कंपन्यांनी सुरु केली होती. परंतू, हे बेकायदेशीर असल्याने व आपला रोजगार बुडत असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केला होता. त्याबाबत आंदोलनेही करण्यात आली होती. त्यानंतर परिवहन विभागाने यावर कारवाई करत या कंपन्यांची दुचाकी टॅक्सी सेवा बंद केली होती. मात्र आता ही सेवा पुन्हा सुरु होणार आहे. राज्य सरकारने ओला, उबर प्रमाणेच बाईक टॅक्सी सेवा सुरु करण्यासाठी मसुदा तयार केला आहे.

महाराष्ट्र ॲग्रीगेटर रेग्युलेशन २०२४ असे या मसुद्याचे नाव असून मोटर वाहन विभागाने हा मसुदा मंगळवार (दि.१४) मंत्रालयात झालेल्या बैठकीत मांडला. परिवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याला दुजोरा दिला आहे. ही नियमावली प्रवाशांच्या सुरक्षेला प्राथमिकता देऊन तयार केल्याचे सांगत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील दोन महिन्यात तो लागू केला जाणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

बाईक टॅक्सीमुळे नवा रोजगार निर्माण होणार आहे. याद्वारे महिलांनाही रोजगार मिळू शकतो. ड्रायव्हर आणि पॅसेंजर यांच्यातील सुरक्षेसाठी दोन सीटच्या मध्ये पुरेशी जागा सोडण्यासाठी स्टँड लावण्याचा विचार देखील आहे. याचा फायदा महिलांना होणार आहे.

बाईक टॅक्सी विलंबाने आल्यावर दंड आकारला जाणार आहे. त्यामध्ये ॲप आधारित चारचाकी किंवा दुचाकी टॅक्सी बोलविल्यानंतर ती १० मिनिटात आली नाही तर चालकाला १०० रुपये दंड आकारला जाणार आहे. तो दंड प्रवाशाला दिला जाणार आहे. तसेच एयरपोर्ट, रेल्वे स्टेशन आणि हॉस्पिटलसाठी केलेले बुकिंग रद्द केल्यास टॅक्सी चालकाला पाचपट रक्कम दंड म्हणून आकारला जाणार आहे. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी या नियमावलीचे प्रस्तुतीकरण केले आहे.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *