८.२९ लाखांच्या विक्रीसह नवतेजस्विनी महोत्सव २०२६ ची यशस्वी सांगता

Spread the love

धाराशिव – महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत २७ ते २९ मार्च २०२६ दरम्यान धाराशिव क्लब मैदान,शहर पोलीस स्टेशनजवळ,धाराशिव येथे आयोजित “नवतेजस्विनी महोत्सव २०२६” चा उत्साहात समारोप आज झाला.या महोत्सवाचे उद्घाटन २७ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले.

या जिल्हास्तरीय प्रदर्शनात धाराशिव जिल्ह्यातील स्वयंसहाय्य महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे एकूण ४२ स्टॉल्स उभारण्यात आले होते.यामध्ये ज्यूस,उसाचा रस,लिंबू सरबत, गावरान तूप,अंडी,वर्मी कंपोस्ट खत, धान्य,कडधान्य,राजमा,कडक भाकरी,शेंगांची चटणी,दुग्धजन्य पदार्थ,मसाले,पापड,कुरडई,शेवया, मनुके,हस्तकला व शोभेच्या वस्तू, मूर्ती,फ्लॉवर पॉट,रेडीमेड कपडे तसेच विविध खाद्यपदार्थांचा समावेश होता.या तिन्ही दिवसांत स्टॉलधारकांची एकूण सुमारे ८ लाख २९ हजार रुपयांची विक्री झाली असून महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महोत्सवाच्या समारोप प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. विद्याचरण कडवकर,सहायक पोलीस निरीक्षक श्री.दिनेश जाधव, संरक्षण अधिकारी श्री.भुजंग भोसले, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री.सुखदेव चिंचोलीकर,तालुका स्तरीय सी.एम.आर.सी.अध्यक्षा श्रीमती.निर्मला उबाळे,श्रीमती.स्मिता पाटील,श्रीमती.सुरेखा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रदर्शनात सहभागी सर्व स्टॉलधारकांचा मान्यवरांच्या हस्ते “नवतेजस्विनी महोत्सव २०२६” सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

हा महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी माविम जिल्हा कार्यालय तसेच तालुका स्तरीय सी.एम.आर.सी.यांनी विशेष प्रयत्न केले.धाराशिवकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री. सुखदेव चिंचोलीकर यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.


  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *