माहिती आयोगात दाखल प्रकरणांचा गतीने निपटारा

Spread the love

छत्रपती संभाजीनगर खंडपीठाची उल्लेखनीय कामगिरी

छत्रपती संभाजीनगर -: राज्य माहिती आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे. सन 2024 मध्ये खंडपीठाने 14 हजार 1 द्वितीय अपिले निकाली काढली असून, 2025 मध्ये 10 हजार 783 द्वितीय अपिलांचा यशस्वी निपटारा करण्यात आला आहे.
आयोगाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या निपटाऱ्याच्या प्रमाणात जवळपास दहापटीने वाढ झाली असून, द्वितीय अपिलांच्या प्रलंबिततेत सुमारे 55 टक्क्यांची लक्षणीय घट झाली आहे.

राज्य माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांच्या प्रभावी प्रशासकीय नियोजनामुळे आणि सातत्यपूर्ण कार्यपद्धतीमुळे ही कामगिरी शक्य झाली आहे. तक्रार निवारणात 2025 मध्ये 10 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. 2024 अखेरीस प्रलंबित असलेल्या 165 तक्रारींची संख्या डिसेंबर 2025 अखेर 85 वर आली असून, त्यामुळे प्रलंबित तक्रारींमध्ये 51 टक्के घट झाली आहे.

द्वितीय अपिलांच्या प्रलंबिततेतही मोठी घट झाली आहे. 2024 अखेरीस 8 हजार 699 द्वितीय अपिले प्रलंबित होती. ती संख्या डिसेंबर 2025 अखेर 3 हजार 946 इतकी झाली असून, प्रलंबित अपिलांच्या प्रमाणात सुमारे 55 टक्के घट झाल्याचे स्पष्ट होते.
राज्य माहिती आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाची ही कामगिरी माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीस बळ देणारी ठरली आहे.

प्रतिक्रिया
राज्य माहिती आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामार्फत प्रकरणांचा जलद व पारदर्शक निपटारा करण्यावर भर देण्यात आला आहे. नियोजनबद्ध कामकाज, सुनावणीतील शिस्त आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे प्रलंबित अपिले व तक्रारींच्या निपटाऱ्यात लक्षणीय प्रगती साधता आली आहे.
नागरिकांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत वेळेत न्याय मिळावा, हाच आयोगाचा मुख्य उद्देश आहे. भविष्यातही प्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील तसेच माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी अधिक मजबूत करण्यात येईल,” प्रकाश इंदलकर
राज्य माहिती आयुक्त

  • Related Posts

    रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तीकीचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे हस्ते प्रकाशन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – देशातील रोजगार,बेरोजगारी आणि असंघटित क्षेत्राच्या आर्थिक स्थितीबाबत अद्ययावत व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत (MoSPI) नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (Periodic…

    १ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक ;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज/मुंबई विशेष वृत्तसेवा:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *