अनुसूचित जाती-जमाती योजनांच्या आढाव्यासाठी आयोगाचे सदस्य अँड.गोरक्ष लोखंडे २० व २१ जानेवारी रोजी जिल्ह्यात

Spread the love

धाराशिव – राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य ॲड.गोरक्ष लोखंडे हे २० ते २१ जानेवारी २०२६ या दोन दिवसाच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील विविध नगरपरिषदांमध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनांचा तसेच आर्थिक दुर्बल घटकांवरील खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे.

दि.१९ जानेवारी रोजी पुणे येथून सायंकाळी बायरोडने धाराशिवकडे रवाना होऊन शासकीय विश्रामगृह, धाराशिव येथे आगमन व मुक्काम करतील.

२० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मुख्याधिकारी,धाराशिव नगरपरिषद यांच्या समवेत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा तसेच आर्थिक दुर्बल घटकांवर केलेल्या खर्चाचा मागील पाच वर्षांचा आढावा व कामाची तपासणी करण्यात येणार आहे.तसेच अनुसूचित जाती-जमातींना प्राप्त होणाऱ्या निधीबाबत आढावा व कामाची तपासणी करण्यात येणार आहे.लाड पागे,दलित वस्ती, अण्णाभाऊ साठे सुधार योजना,घरकुल योजना,अनुदानाबाबत तसेच सफाई कर्मचारी टेंडर व सफाई कर्मचाऱ्यांबाबत आढावा घेण्यात येणार आहे.

यानंतर सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण, धाराशिव यांच्या समवेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा व खर्चाचा आढावा घेऊन चर्चा करण्यात येणार आहे.दुपारी १२.३० वाजता मुख्याधिकारी,उमरगा नगरपरिषद यांच्या समवेत वरीलप्रमाणेच योजनांचा, खर्चाचा व मागील पाच वर्षांच्या कामाचा आढावा व तपासणी करण्यात येणार आहे.दुपारी २ वाजता मुख्याधिकारी, लोहारा नगरपरिषद,दुपारी ३.३० वाजता मुख्याधिकारी,कळंब नगरपरिषद आणि सायंकाळी ५ वाजता मुख्याधिकारी, तुळजापूर नगरपरिषद यांच्या समवेत अनुक्रमे बैठका घेऊन योजनांची अंमलबजावणी,निधी वितरण,कामांची गुणवत्ता तसेच सफाई कर्मचारी संदर्भातील बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.सायंकाळी शासकीय विश्रामगृह, धाराशिव येथे मुक्काम करतील.

२२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मुख्याधिकारी,परंडा नगरपरिषद यांच्या समवेत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा,आर्थिक दुर्बल घटकांवरील खर्चाचा,मागील पाच वर्षांच्या कामाचा आढावा व तपासणी करण्यात येणार आहे.तसेच अनुसूचित जाती-जमातींसाठी असलेल्या विविध योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

दुपारी १२.३० वाजता मुख्याधिकारी भूम नगरपरिषद यांच्या समवेत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा व आर्थिक दुर्बल घटकांवर केलेल्या खर्चाचा मागील पाच वर्षांचा आढावा तसेच कामाची तपासणी करण्यात येणार आहे.तसेच अनुसूचित जाती-जमातींना प्राप्त होणाऱ्या निधीबाबत आढावा व कामाची तपासणी करण्यात येणार आहे.लाड पागे योजना,दलित वस्ती, अण्णाभाऊ साठे सुधार योजना,घरकुल योजना,अनुकंपाबाबत तसेच सफाई कर्मचारी टेंडर व सफाई कर्मचारी इत्यादी बाबींवर आढावा व चर्चा करण्यात येणार आहे.

दुपारी २ वाजता मुख्याधिकारी,वाशी नगरपरिषद यांच्या समवेत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा व आर्थिक दुर्बल घटकांवर केलेल्या खर्चाचा मागील पाच वर्षांचा आढावा तसेच कामाची तपासणी करण्यात येणार आहे.तसेच अनुसूचित जाती-जमातींना प्राप्त होणाऱ्या निधीबाबत आढावा व कामाची तपासणी करण्यात येणार आहे.लाड पागे योजना,दलित वस्ती, अण्णाभाऊ साठे सुधार योजना,घरकुल योजना,अनुकंपाबाबत तसेच सफाई कर्मचारी टेंडर व सफाई कर्मचारी इत्यादी बाबींवर आढावा व चर्चा करण्यात येणार आहे.

दुपारी ३.३० वाजता मुख्याधिकारी,मुरुम नगरपरिषद यांच्या समवेत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा व आर्थिक दुर्बल घटकांवर केलेल्या खर्चाचा मागील पाच वर्षांचा आढावा तसेच कामाची तपासणी करण्यात येणार आहे.तसेच अनुसूचित जाती-जमातींना प्राप्त होणाऱ्या निधीबाबत आढावा व कामाची तपासणी करण्यात येणार आहे.लाड पागे योजना, दलित वस्ती,अण्णाभाऊ साठे सुधार योजना, घरकुल योजना,अनुकंपाबाबत तसेच सफाई कर्मचारी टेंडर व सफाई कर्मचारी व इतर बाबींवर आढावा घेण्यात येणार आहे.

सायंकाळी ५ वाजता जिल्हा समाजकल्याण अधिकारी,जिल्हा परिषद, धाराशिव यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा बैठक व चर्चा करण्यात येणार आहे.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *