निवडणूक कालावधीत जात,धर्म व भाषावार शिबिरे-मेळावे बंद; जिल्ह्यात ७ फेब्रुवारीपर्यंत निर्बंध

Spread the love

धाराशिव – राज्य निवडणूक आयोगाने १३ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ चा कार्यक्रम जाहीर केल्याने,त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी,या उद्देशाने धाराशिव जिल्ह्यात महत्त्वाचा आदेश जारी करण्यात आला आहे.

निवडणूक कालावधीत जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे जात,धर्म किंवा भाषावार शिबिरे व मेळावे आयोजित केल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता,जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ चा वापर करून जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत,म्हणजेच ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत,कुठेही कोणत्याही प्रकारचे जात,भाषा किंवा धार्मिक शिबिरे व मेळावे आयोजित करण्यावर निर्बंध घातले आहेत.हे आदेश दिनांक १३ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या हद्दीत लागू राहतील.

  • Related Posts

    ८ ऑगस्टपर्यंत गणनापत्र (Enumeration Form) भरण्याचे आवाहन; मतदार यादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी तहसील प्रशासनाची नागरिकांना सूचना

    Spread the love

    Spread the loveधाराशिव  : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण (S.I.R.) 2026 अभियानांतर्गत धाराशिव तालुक्यातील सर्व मतदारांनी आपले गणनापत्र (Enumeration Form – EF) वेळेत भरावे, असे…

    निरक्षर,अक्षर ओळख नाही – सहायकासाठी 41 मतदारांचे अर्ज, घोडेबाजारासाठी क्लुप्ती

    Spread the love

    Spread the loveमतपत्रिकेवर उमेदवाराचा फोटो तरीही हवा सहायक, छानणी सुरु – विधान परिषद निवडणुक धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज विधान परिषदेच्या उस्मानाबाद बीड व लातुर या स्थानिक स्वराज मतदार संघासाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *