जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६

Spread the love

जि.प – ४ आणि पं.स – १ नामनिर्देशन पत्र दाखल

धाराशिव – जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने १३ जानेवारी २०२६ रोजी घोषीत केला आहे.सदर निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना विहित केल्यानुसार शासन राजपत्र तसेच स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद धाराशिव,सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये,तहसील कार्यालये तसेच गटविकास अधिकारी कार्यालयांच्या नोटीस बोर्डवरही ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पंचायत समितीनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये स्थापन करण्यात आली आहे.आज १७ जानेवारी २०२६ रोजी एकूण ५१७ व्यक्तींना १०९३ कोरे नामनिर्देशनपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.त्यापैकी जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी गट – ४,तर पंचायत समिती निवडणुकीसाठी गट– १ असे एकूण ५ नामनिर्देशनपत्रे आज रोजी दाखल झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • Related Posts

    ८ ऑगस्टपर्यंत गणनापत्र (Enumeration Form) भरण्याचे आवाहन; मतदार यादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी तहसील प्रशासनाची नागरिकांना सूचना

    Spread the love

    Spread the loveधाराशिव  : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण (S.I.R.) 2026 अभियानांतर्गत धाराशिव तालुक्यातील सर्व मतदारांनी आपले गणनापत्र (Enumeration Form – EF) वेळेत भरावे, असे…

    निरक्षर,अक्षर ओळख नाही – सहायकासाठी 41 मतदारांचे अर्ज, घोडेबाजारासाठी क्लुप्ती

    Spread the love

    Spread the loveमतपत्रिकेवर उमेदवाराचा फोटो तरीही हवा सहायक, छानणी सुरु – विधान परिषद निवडणुक धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज विधान परिषदेच्या उस्मानाबाद बीड व लातुर या स्थानिक स्वराज मतदार संघासाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *