नामनिर्देशन दाखल करताना वाहनताफा व उपस्थितीवर निर्बंध ; ७ फेब्रुवारीपर्यंत आदेश

Spread the love

धाराशिव – जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–२०२६ चा कार्यक्रम जाहीर केल्याने १३ जानेवारीपासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.निवडणूक प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी,या उद्देशाने उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल करताना अवलंब करावयाच्या कार्यपद्धतीबाबत जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे आदेश निर्गमित केले आहेत.

निवडणूक कालावधीत उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करताना वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या, मोटारसायकल किंवा इतर वाहने समाविष्ट करू नयेत.तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात जास्तीत जास्त पाच व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कोणालाही दालनात प्रवेश दिला जाणार नाही.

तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करताना कार्यालयाच्या परिसरात कोणत्याही प्रकारची मिरवणूक अथवा सभा घेणे,घोषणा देणे,वाद्य वाजविणे,गाणी म्हणणे किंवा कोणत्याही स्वरूपाचा निवडणूक प्रचार करण्यावरही पूर्णतः प्रतिबंध घालण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी हे निर्बंध आवश्यक आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये हे आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार,निवडणूक कालावधीत उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्तींव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
हे आदेश दिनांक १३ जानेवारी २०२६ ते दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या हद्दीत लागू राहतील.

  • Related Posts

    ८ ऑगस्टपर्यंत गणनापत्र (Enumeration Form) भरण्याचे आवाहन; मतदार यादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी तहसील प्रशासनाची नागरिकांना सूचना

    Spread the love

    Spread the loveधाराशिव  : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण (S.I.R.) 2026 अभियानांतर्गत धाराशिव तालुक्यातील सर्व मतदारांनी आपले गणनापत्र (Enumeration Form – EF) वेळेत भरावे, असे…

    निरक्षर,अक्षर ओळख नाही – सहायकासाठी 41 मतदारांचे अर्ज, घोडेबाजारासाठी क्लुप्ती

    Spread the love

    Spread the loveमतपत्रिकेवर उमेदवाराचा फोटो तरीही हवा सहायक, छानणी सुरु – विधान परिषद निवडणुक धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज विधान परिषदेच्या उस्मानाबाद बीड व लातुर या स्थानिक स्वराज मतदार संघासाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *