एसपी अतुल कुलकर्णी यांनी घेतला जनता दरबार

Spread the love

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, यांच्याकडुन सामान्य नागरिकांचे तक्रारीचे समक्ष निराकरण करण्यासाठी भव्य जनता दरबार तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री. अतुल वि.कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या कल्पनेतुन सोलापूर ग्रामीण घटकाअंतर्गत येणा-या नागरिकांचे तक्रारांचे निराकरण करण्याकरीता सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील अलंकार हॉल पोलीस मुख्यालय येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते. सकाळी १०.०० वा.ते संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत ग्रामीण भागातील तक्रारदार यांची समक्ष भेट घेण्याकरीता पोलीस प्रमुख श्री. अतुल वी कुलकर्णी स्वतः उपस्थित होते. पोलीस अधीक्षक यांनी उपस्थित नागरिकांच्या तक्रारी समोरा समोर ऐकून घेतल्या. नागरिकांच्या तक्रारीचे निरासन करण्यासाठी श्री. राहुल आत्राम सर, भापोसे परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचेसह श्री. संकेत देवळेकर एस.डी.पी.ओ. सोलापूर उपविभाग, असे अधिकारी उपस्थित होते. उपस्थित नागरिकांच्या तक्रारीचे दखल घेवून जागीच निराकरण करण्याकरीता संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते, जनता दरबार दरम्यान ग्रामीण घटकातील महिलांच्या विषयीच्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी भरोसा सेल, महिला शाखा देखील उपस्थित होते. महिलांच्या कौटुंबिक तक्रारींच्या निराकरण करणे दरम्यान सुमारे ६५ नागरिक उपस्थित होते.

जनता दरबार तक्रार निवारण दिन दरम्यान सुमारे ७८ नागरिकांनी आपल्या समस्या पोलीसांसमोर मांडल्या. सर्वांचे तक्रारीचे समाधान झाले. ज्यांच्या तक्रारीवर दखल घ्यायची आहे असे तक्रारदार यांची तक्रार संबंधित पोलीस ठाणेस वर्ग केले आहेत. तसेच जवळपास १४३ तक्रारी अर्जावरती कारवाई करुन निर्गती केली आहे. मा. पोलीस अधीक्षक, यांनी नागरिकांच्या तक्रारीकरीता विधी सेवेकरीता अॅड. श्री. शिवकैलास झुरळे, उपमुख्य लोकअभिरक्षक विधीसेवा प्राधिकरण सोलापूर यांना उपस्थित ठेवून नागरिकांना त्यांच्या तक्रारीबद्दल योग्य तो कायदेशीर सल्ला मिळण्यासाठी मार्गदर्शन होणेकरीता निमंत्रित केले होते. भरोसा सेल यांनी महिला तक्रारींचे निराकरण करीत असताना सुमारे एक वर्षापासून विभक्त असलेले महिला तिच्या माहेरच्या कुटुंबियासोबत हजर असताना सासरचे नातेवाईक यांचे योग्यते समुपदेशन करुन तिला सासरी नांदण्यास पाठविले.

दरम्याने महिलेच्या नातेवाईकांनी आनंद व्यक्त करुन पोलीसांचे अभार मानले आहेत. सदरचा जनता दरवार व तक्रार निवारण दिन पार पाडण्याकरीता पोसई श्री. उस्मान शेख, पोकों सचिन चव्हाण, मपोना- ज्योती कोरे, मपोकों-पुजा करडे, मपोना-गंवडी, मपोकॉ-कुर्ले, मपोकों-विश्वकर्मा यांनी आलेल्या सर्व तक्रारदारांचे तक्रारी ऐकुन तक्रारीचे स्वरुपानुसार तात्काळ कारवाई होणेकरीता संबंधित पोलीसठाणे यांच्याकडे पाठवून पाठपुरावा केला व तक्रारदाराचे निरसन केले आहे. तसेच महिला शाखा भरोसा सेलकडील मपोसई-सुरेखा शिंदे, ए.एस.आय. कवचाळे, मपोहेकॉ भोगे, मपोहेकों-चव्हाण, मपोकों-मस्के, मपोकों-शिंदे, मपोकॉ-पवार असे पथकासह हजर होते.

  • Related Posts

    तुळजापुर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायालयाचे रविवारी उद्घाटन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – तुळजापुर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायालयाचे उद्घाटन रविवार,६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांच्या शुभहस्ते या…

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *