कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणांपेक्षा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे” या विधानातूनच युतीची सुरुवात…!!

Spread the love

मनसे–शिवसेना युतीची अधिकृत घोषणा; महापालिका निवडणुकांसाठी एकत्र लढण्याचा निर्णय

मुंबई  (प्रतिनिधी) – आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक महत्त्वाची आणि बहुचर्चित घडामोड घडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन प्रमुख मराठी पक्षांनी युतीची अधिकृत घोषणा केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

ही युती गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय होती. राज ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान व्यक्त केलेल्या, “कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणांपेक्षा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे” या विधानातूनच या युतीची सुरुवात झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे वाक्य केवळ मुलाखतीतील नसून तीव्र भावना असल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले की, ही युती केवळ जागावाटप किंवा सत्तेसाठी नाही, तर मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आहे. आज मुंबई आणि परिसरात, तसेच उद्या राज्याच्या इतर भागांत मराठी अस्मितेला संपवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, त्या शक्तींविरोधात एकत्र लढण्यासाठी ही युती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

युतीतील जागावाटप, कोणत्या पक्षाला किती आणि कुठल्या जागा मिळणार, याबाबत आज कोणतीही माहिती देण्यात आली नाही. या बाबी तांत्रिक स्वरूपाच्या असून योग्य वेळी संबंधित नेते त्याची घोषणा करतील, असे दोन्ही पक्षांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुंबई महापालिकेचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचाच असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असेल, असा ठाम दावा यावेळी करण्यात आला.

मनसे–शिवसेना युतीच्या घोषणेमुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.

  • Related Posts

    निष्ठेचे प्रमाणपत्र मागणाऱ्यांनी आधी इतिहास समजून घ्यावा; गुंड कुटुंबाचा विरोधकांना थेट सवाल!

    Spread the love

    Spread the love१९७८ पासूनचा संघर्ष, संघटन आणि पक्षनिष्ठेचा इतिहास मांडत गुंड कुटुंबाची भूमिका; “निष्ठा शब्दांनी नव्हे, तर कृतीतून सिद्ध होते” धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निष्ठेचे प्रमाणपत्र मागणाऱ्यांनी आधी इतिहास…

    ऑपरेशन टायगरचा मोठा धमाका; खासदार ओमराजेंचा शिंदे सेनेकडे मोर्चा, ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का?

    Spread the love

    Spread the loveकार्यकर्त्यांच्या बैठकीत भूमिका स्पष्ट; “जो माझ्यासोबत येईल त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही” – ओमराजे निंबाळकर धाराशिव | प्रतिनिधी – विश्व प्रशांत न्यूज. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *