संघ परिवारातील कार्यकर्ता पंचायत समिती निवडणूक लढवणार

Spread the love

परंडा तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अनेक वर्षांपासून सक्रियपणे कार्यरत असलेले कार्यकर्ते श्री. लक्ष्मण सौदागर गोरे राहणार करंजा यांनी येणारी पंचायत समिती निवडणूक वडनेर गणातून लढवण्याची इच्छा जाहीर केली आहे.
गेल्या 15 वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्यांनी आतापर्यंत तालुका संपर्क प्रमुख, तालुका कार्यवाह, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तालुका जागरण गट प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. या कार्यातून सामाजिक जीवनाची सुरुवात करून, युवक संघटन, आरोग्य जनजागृती, रोजगार व क्रीडा क्षेत्रात त्यांनी सातत्याने काम केले आहे. “समाजहित, पारदर्शकता आणि विकास” हे ब्रीद घेऊन पंचायत समिती स्तरावर सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत प्रभावी काम करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य सुविधा, युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम, महिलांचे सक्षमीकरण व शेतकऱ्यांचे प्रश्न यावर ठोस काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. संघ परिवारातील शिस्त, निःस्वार्थ सेवा व राष्ट्रप्रथम मूल्यांच्या आधारावर जनतेचा विश्वास संपादन करून पंचायत समितीत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. लोणी जिल्हा परिषद गटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटन पण मजबूत आहे.
लवकरच तालुक्यातील विविध सामाजिक घटकांशी संवाद साधून व्यापक जनसंपर्क अभियान राबवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

  • Related Posts

    तगर भूमी जेतवन बुद्ध विहारात वर्षावास महोत्सवाचे आयोजन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्षावास निमित्त निसर्गाच्या सानिध्यात तगर भुमी जेतवन बुद्ध विहार,गडदेवदरी परिसर,धाराशिव येथे वर्षावास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.मौजे गडदेवदरी घाटंग्री परिसर ता.जि.धाराशिव येथे तीन…

    ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

    Spread the love

    Spread the loveईद-ए-मिलाद निमित्त नगरसेवक अझहर मुजावरांचा उपक्रम; एसीएम ग्रुपच्या रक्तदान शिबिरात २००-३०० युवकांचा सहभाग धाराशिव – “पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.व.)” यांच्या जन्मदिनी साजरा केला जाणारा ईद-ए-मिलाद हा मुस्लिम बांधवांसाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *