‘व्हॉईस ऑफ मीडिया’ देणार चार राज्य पुरस्कार ,पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा ,गेल्यावर्षी दोन हजारावून अधिक पत्रकारांनी नोंदविला होता सहभाग

Spread the love

मुंबई (प्रतिनिधी) पत्रकारांची जगातील सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडियाने पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड’साठी पुरस्कारांची घोषणा केलेली आहे. २०२४ पुरस्कारांसाठी प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख २० जानेवारी २०२५ आहे. त्यापूर्वी या पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकारांसाठी चांगले कार्य करण्याच्या उद्देशाने राज्यातील वीस संपादकांनी एकत्रित येऊन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची निर्मिती केली आहे. आज जगभरात ३ लाखापेक्षा पेक्षा जास्त सदस्य संख्या असलेली ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही पत्रकारांची संघटना, संस्था आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही ४९ देशांपर्यंत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही पत्रकारांची संघटना पोहचली आहे. या संघटनेने पत्रकारांच्या पंचसूत्रीसह इतर समस्यांसोबतच सकारात्मक पत्रकारितेसाठी ही पुढाकार घेतला आहे. प्रथम, द्वितीय, महिला पत्रकारांसाठी, व तृतीय क्रमांक पुरस्कार असे चार राज्य पातळीवरचे हे पुरस्कार आहेत. यात सहभागी होणाऱ्या पत्रकारांनी दैनिक व साप्ताहिकाचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. प्रस्ताव देताना संपादकांचे पत्र जोडावे. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेल्या किमान ४२ किंवा त्यापेक्षा अधिक थेट परिणामकारक, सकारात्मक बातम्या, लेख या स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. ही स्पर्धा महाराष्ट्र व मराठी भाषेपूर्तीच मर्यादित आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे मुख्य पदाधिकारी अनिल मस्के, दिगंबर महाले, योगेंद्र दोरकर, अजित कुंकूलोळ, मंगेश खाटीक,विजय चोरडिया हे निवड प्रक्रियेचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे एकवीस आठ आकरा याप्रमाणे पदाधिकारी यात सहभागी होऊ शकणार नाहीत. सदस्य सहभागी होऊ शकतात. यांची नोंद घ्यावी. पत्रकारांनी आपले प्रस्ताव थेट ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ कोकण विभागीय कार्यालय, एल.३०-१२०१, स्वप्नपूर्ती, सेक्टर ३६, खारघर, नवी मुंबई या पत्त्यावर २० जानेवारी २०२४ पर्यंत पाठवायचे आहेत. गेल्या वर्षी या पुरस्कारासाठी दोन हजार तीनशे प्रस्ताव आले होते. तसेच आपल्या भागात सामाजिक कार्यासह पत्रकारांच्या मोठ्या उपक्रमात सहभागी असणाऱ्या पाच व्यक्तींची नावे आम्ही ‘महाराष्ट्र भूषण’साठी मागवत आहोत.

  • Related Posts

    जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रयत्नआधार नोंदणीच्या माध्यमातूनमुकबधिर बालकाचे कुटुंब शोधण्यात यश

    Spread the love

    Spread the loveअकोला – : जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि आधार नोंदणी प्रक्रियेचा प्रभावी वापर करून एका मुकबधिर हरविलेल्या बालकाचे कुटुंब शोधण्यात यश आले.बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनात ही…

    फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीकडून उपवर्गीकरण (अबकड) विरोधी मोर्चात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जिल्हाधिकारी यांना निवेदन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : आरक्षण उपवर्गीकरण (अबकड) विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात फुले,शाहू, आंबेडकर उद्यान कृती समितीने सक्रीय सहभाग घेतला.यावेळी समितीच्या वतीने मोर्चात सहभागी झालेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *