शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने सुसंस्कृत, अभ्यासू व्यक्तिमत्व गमावले- उपमुख्यमंत्री अजित पवार

Spread the love

शिवराज पाटील चाकूरकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार

यांची श्रद्धांजली

नागपूर : - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष, देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एक सभ्य,सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, अशी शोकसंवेदना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. आपल्या शोक संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, शिवराज पाटील चाकूरकर यांनी लोकसेवेचा नवा आदर्श निर्माण केला होता. साधेपणा आणि नैतिक मूल्यांचे ते प्रतीक होते. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंजाबचे राज्यपाल अशी विविध पदे भूषवत असताना त्यांनी राजकारणातील नैतिकता कायम जपली. लोकसभा अध्यक्ष म्हणून काम करीत असताना लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, नवीन ग्रंथालय इमारत यासारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली. त्यांच्या कारकिर्दीतच उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू झाले. भारतीय संविधानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

  • Related Posts

    बीएलओचे काम पाहणारे शिक्षक इंगळे यांचा अपघाती मृत्यू

    Spread the love

    Spread the loveधाराशिव  (प्रतिनिधी) – तालुक्यातील बेंबळी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले व सध्या बीएलओचे कर्तव्य पार पाडणारे गोविंद इंगळे रा‌.कनगरा ता. धाराशिव (वय – ५० वर्षे)…

    आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय; तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली ३० तासांची झुंज यशस्वी,तेरणा नदीत बुडालेल्या अमरचा मृतदेह अखेर सापडला; तेर गावावर शोककळा..

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज प्रतिनिधी…. धाराशिव तालुक्यातील तेर येथे संत गोरोबाकाका मंदिराजवळ तेरणा नदीच्या पात्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल ३० तासांच्या अथक, समन्वयित आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर अखेर सापडला. या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *