प्रजासत्ताक दिनी धक्कादायक घटना; झेंडा वंदनावेळी दारूबंदी अधिकाऱ्याचा मृत्यू

Spread the love

उमरगा (धाराशिव) | प्रतिनिधी – २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी उमरगा तालुक्यातील तलमोड येथे हृदयद्रावक घटना घडली. दारूबंदी व अबकारी विभागाचे अधिकारी मोहन जाधव (वय ५५) हे झेंडा वंदन करत असतानाच अचानक कोसळले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
उमरगा तालुक्यातील तलमोड सीमा तपासणी नाक्यावर दारूबंदी व अबकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले मोहन जाधव हे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी झाले होते. झेंडा वंदन सुरू असतानाच ते अचानक खाली पडल्याने उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. सहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना उचलून वैद्यकीय मदतीसाठी हलविण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असून, झेंडा वंदनाच्या क्षणीच ते कोसळल्याचे स्पष्टपणे दिसून येते. मोहन जाधव हे मूळचे सोलापूर येथील रहिवासी होते. त्यांच्या अचानक निधनामुळे दारूबंदी व अबकारी विभागासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
देशाभिमानाने साजरा होणारा प्रजासत्ताक दिन या घटनेमुळे शोकमय ठरला. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.

  • Related Posts

    बीएलओचे काम पाहणारे शिक्षक इंगळे यांचा अपघाती मृत्यू

    Spread the love

    Spread the loveधाराशिव  (प्रतिनिधी) – तालुक्यातील बेंबळी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले व सध्या बीएलओचे कर्तव्य पार पाडणारे गोविंद इंगळे रा‌.कनगरा ता. धाराशिव (वय – ५० वर्षे)…

    आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय; तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली ३० तासांची झुंज यशस्वी,तेरणा नदीत बुडालेल्या अमरचा मृतदेह अखेर सापडला; तेर गावावर शोककळा..

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज प्रतिनिधी…. धाराशिव तालुक्यातील तेर येथे संत गोरोबाकाका मंदिराजवळ तेरणा नदीच्या पात्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल ३० तासांच्या अथक, समन्वयित आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर अखेर सापडला. या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *