स्वआधार मतिमंद मुलींच्या बालगृहात जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा

Spread the love

धाराशिव – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धाराशिव,दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त तुळजाई प्रतिष्ठान संचलित स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह,विमानतळ रोड,आळणी येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.

हा कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश श्रीमती भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी देवदत्त गिरी यांनी भूषविले.तसेच श्री.सचिदानंद बांगर (वै.सा.का.,जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी,जिल्हा परिषद धाराशिव),डॉ.निखील नवले (न्यूरोलॉजिस्ट),सरकारी वकील ऍड. गुंड,अॅड.गोरेख कस्पटे,स्वामी समर्थ मुकबधीर शाळेचे मुख्याध्यापक ऍड. गाडे,शकील शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मतिमंदतेचे जनक म्हणून ओळखले जाणारे जीन मार्क इटार्ड यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर बालगृहातील मुलींनी मंगल स्वागतगीत सादर केले आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले.

गेल्या सहा–सात वर्षांपासून बालगृहातील मुलींना विनामूल्य वैद्यकीय सेवा देणारे डॉ.निखील नवले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या सेवेमुळे मुलींमध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलांची नोंद घेऊन मान्यवरांनी त्यांचा गौरव केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुळजाई प्रतिष्ठानचे सचिव श्री.शहाजी चव्हाण यांनी केले.दिव्यांग विशेष बालकांसाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यानंतर सचिव श्रीमती भाग्यश्री पाटील यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा मोफत टोल फ्री क्रमांक १५१००,बौद्धिक व मानसिक विकलांगांसाठीचा १४४४६,तसेच बालकांसाठीची मदतवाणी १०९८ या महत्वाच्या सेवांची माहिती देत दिव्यांगांच्या हक्क व कायद्यांविषयी मार्गदर्शन केले.

बालगृहातील मुलींनी सादर केलेल्या मनमोहक सामूहिक नृत्याने सर्वांचे मन मोहून घेतले.त्यानंतर मान्यवरांनी मुलींना फळवाटप केले तसेच दिव्यांग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांतील विजेत्या मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन रूपाली कांबळे यांनी केले तर आभार निकिता माने यांनी मानले.

  • Related Posts

    फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव :- लोकराजा,आरक्षणाचे जनक, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर सेवा भावी संस्था धाराशिव संचलित फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अभिवादन…

    गरजूंसाठी मोफत व सुलभ न्याय मिळवून देणे हेच विधी सेवा प्राधिकरणाचे ध्येय ,सचिव भाग्यश्री पाटील

    Spread the love

    Spread the loveसामाजिक समता सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेशांचे वितरण धाराशिव -: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *