जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत लातूर कारागृहात जनजागृती शिबीर

Spread the love

लातूर – : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या किमान समान कार्यक्रमानुसार एड्स या आजाराबाबत जनजागृतीसाठी लातूर कारागृह येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर जिल्हा न्यायालय व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे व्यंकटेश गिरवलकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे समुपदेशक तानाजी भोसले, उडाण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रमोद सोमवंशी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे श्री. ढोपरे यांनी मार्गदर्शन केले. कारागृह अधीक्षक श्री. मुलाणी यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्री. गिरवलकर यांनी एड्स आजाराबाबत कैद्यांना एचआयव्ही, एड्स म्हणजे काय, या आजार कसा पसरतो व त्याची लक्षणे काय आहेत, याबाबत माहिती दिली. एड्सबाबत असलेली उपचार पध्दतीबाबत तसेच सदरील आजारास प्रतिबंध कसे करता येईल, याबाबत कैद्यांना मार्गदर्शन केले.


  • Related Posts

    तापाचा वाढता धोका ; जिल्ह्यात ‘आरोग्य अलर्ट’

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्यात सध्या तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.वाढत्या तापाच्या रुग्णांमध्ये डेंग्यू, मलेरियासह अन्य कीटकजन्य आजार उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिक,शाळा- महाविद्यालये आणि…

    नेत्रदानाचा संदेश घेऊन धाराशिव येथे जनजागरण रॅली४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त उपक्रम ; विद्यार्थी,शिक्षकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – नेत्रदानातून गरजूंच्या आयुष्यात दृष्टीचा प्रकाश निर्माण होऊ शकतो,’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त शुक्रवारी आज ४ सप्टेंबर रोजी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *