सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव अडचणीला धावले !

Spread the love

धाराशिव पोलिसांची कर्तव्य आणि माणुसकीचा अनोखा नमुना

सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव अडचणीला धावले !

धाराशिव – देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणारा मेडसिंगा गावचा ओम लिंबराज भोरे हा युवक भारतीय सैन्यात अग्नीवीर म्हणून निवडला गेला. परंतु त्याच्या स्वप्नांच्या वाटेत उभी होती एक मोठी अडचण — पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेटची आवश्यकता, आणि केवळ दोन दिवसांचा वेळ!

सर्व कागदपत्रे तयार… पण सर्वात महत्त्वाचा कागद मात्र नव्हता. काळजी, तणाव आणि वेळेचा तुटवडा ओमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. अशा वेळी मदतीचा हात पुढे केला मेडसिंगा येथील शेतकरी पुत्र व रुग्णसेवक असलेले सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी.

ओमची अडचण कळताच त्यांनी तत्काळ धाराशिव पोलिस प्रशासनाशी संपर्क साधला आणि त्यांच्या विशेष सहकार्यामुळे अवघ्या १ तासात युवकास पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट उपलब्ध करून देण्यात आले!

त्या क्षणी ओमने व्यक्त केलेल्या भावना प्रत्येक भारतीयाच्या हृदयाला भिडणाऱ्या होत्या.
“हा कागद नसता तर देशसेवेत मोठी अडचण आली असती… पण धाराशिव पोलिसांनी मला वेळेत बळ दिलं. आता देशसेवा करून भारतमातेचे ऋण फेडण्याची शक्ती मिळाली.”

या कार्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान:

👮 पोलीस अधीक्षक – रितू खोकर
👮 सहाय्यक पोलीस निरीक्षक – गणेश पाटील (बेंबळी पोलिस स्टेशन)
👮 पोलीस हेडकॉन्स्टेबल – पवनकुमार कुलकर्णी
👮 एसपी ऑफिस – पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन पोतदार
👮 पोलीस हेडकॉन्स्टेबल – विशाल बिदे

या सर्वांनी दाखवलेली गती, संवेदनशीलता आणि सेवाभाव हा केवळ शासकीय प्रक्रियेचा भाग नव्हता, तर माणुसकीचा जिवंत अनुभव होता.

मनोज जाधव यांनीही या सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांप्रती मानाचा मुजरा सादर करत “हीच खरी माणुसकी… आणि हीच खरी देशसेवा!” असे गौरवोद्गार काढले.
ओम भोरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धाराशिव पोलिसांनी दाखवलेली तत्परता पाहून आज संपूर्ण गाव त्यांच्या कार्याला सलाम करत आहे.
त्यांनी दिलेला एक तास ओमच्या आयुष्यात नव्या पर्वाची सुरुवात घेऊन आला भारतमातेची सेवा करण्याची संधी!

ही घटना म्हणजे प्रक्रियेपलीकडची, हृदयाला भिडणारी माणुसकी… आणि धाराशिव पोलिसांच्या गौरवाचा सुवर्ण क्षण!

  • Related Posts

    अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जप्रकरणांवर धाराशिवमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा!

    Spread the love

    Spread the loveअध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे मराठा सेवा संघातर्फे स्वागत; मराठा तरुणांच्या आर्थिक प्रश्नांवर सविस्तर संवाद धाराशिव : प्रशांत मते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मा. नरेंद्र पाटील यांचे…

    आळणी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आळणी येथे १६ ऑगस्ट रोजी मिनी मॅरेथॉन;

    Spread the love

    Spread the loveविद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनआळणी, ता. जि. धाराशिव : स्व. शंकरराव रंगनाथ फुगारे (साळुंके) सर यांच्या स्मरणार्थ आयोजित आळणी ग्रामस्थ व फुगारे परिवाराच्या वतीने ‘आळणी मिनी मॅरेथॉन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *