
श्री.आई तुळजाभवानी मंदिर संस्थान तर्फे भाविक भक्तांच्या सोयीसाठी व व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टिकोनातून, महत्वाच्या व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी खालीलप्रमाणे दर्शन सुविधा प्रस्तावित करण्यात येत आहेत. सर्व महंत, पुजारी व भाविक भक्तांना कळविण्यात येते की, यासंदर्भात काही सूचना अथवा अभिप्राय असल्यास ते दिनांक १९ मे २०२५ ते २६ मे २०२५ दरम्यान संस्थानच्या अधिकृत ई-मेल वर पाठवावेत.
Email id – shreetuljabhavanitemple@gmail.com
प्रस्तावित दर्शन सुविधा:
१) राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, राज्यपाल, न्यायालयीन न्यायाधीश, मंत्री, संसद/विधीमंडळाचे आजी-माजी सदस्य, राज्य मंत्री दर्जा असलेल्या व्यक्ती, सर्व महामंडळाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष, संविधानिक आयोगाचे अध्यक्ष, भारतीय सैन्यदलातील अधिकारी व सैनिक आदी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना कुटुंबासह नि:शुल्क दर्शन.
२) रु. १०,००० किंवा त्याहून अधिक रक्कम अथवा वस्तू अर्पण करणाऱ्या भाविकांना कुटुंबासह नि:शुल्क दर्शन.
३) मंदिरातील प्रथा परंपरेनुसार मंदिरात येणाऱ्या अध्यात्मिक/धार्मिक/मानकरी व मंदिर कामकाजाशी संबंधित व्यक्तींना नि:शुल्क दर्शन.
४) राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला, क्रीडा, विज्ञान, साहित्य, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कारप्राप्त व्यक्ती, महाराष्ट्र व इतर राज्यातील मंदिर देवस्थान समितीचे विश्वस्त यांना नि:शुल्क दर्शन.
५) दिव्यांग (अस्थीव्यंग व अंध), स्तनदामाता व मदतनीसाशिवाय चालू न शकणाऱ्या वयस्कर व्यक्तींना नि:शुल्क दर्शन.
६) केंद्र व राज्य शासनाच्या सेवेतील वर्ग १ चे सर्व प्रशासकीय अधिकारी कुटुंबासह आल्यास ४ व्यक्तींपर्यंत नि:शुल्क दर्शन, त्यानंतर प्रत्येक व्यक्तीसाठी रु. २०० देणगी शुल्क. (कुटुंब- स्वतः, पती-पत्नी, मुले, आई व वडील)
७) उपरोक्त अ.क्र १,४ व ६ मध्ये नमुद नसलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती/संस्थांचे प्रमुख कुटुंबासह आल्यास ४ व्यक्तींपर्यंत नि:शुल्क दर्शन, त्यानंतर प्रत्येक व्यक्तीसाठी रु. २०० देणगी शुल्क. (कुटुंब- स्वतः पती-पत्नी, मुले, आई व वडील)
८) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान विश्वस्त सदस्य, मंदिर व्यवस्थापक यांच्या शिफारशीने आलेल्या व्यक्तींना रु. २०० देणगी शुल्क.
९) महाराष्ट्र राज्य व इतर राज्यातील मंत्री कार्यालय/संसद/विधिमंडळ सदस्य व संविधानिक महामंडळ/आयोग यांच्या लेखी शिफारशीने आलेल्यांना रु. २०० देणगी शुल्क.
या प्रस्तावित योजना मंदिर व्यवस्थापनाच्या सुव्यवस्थेसाठी असून, भाविक भक्तांचे सहकार्य अपेक्षित आहे.
- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर