सर्व रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसीची अंतिम मुदत ३० जून जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Spread the love

धाराशिव – सार्वजनिक वितरण प्रणालीतील सर्व रेशनकार्डधारकांची ई-केवायसी प्रक्रिया राज्य शासनाच्या निर्देशानुसार सध्या सुरू असून,केंद्र शासनाच्या २ मे २०२५ रोजीच्या पत्रानुसार ही प्रक्रिया ३० जून २०२५ पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

या तारखेनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.तसेच,ज्या कार्डधारकांची ई-केवायसी पूर्ण झालेली नसेल,अशा कार्डधारकांना जुलै २०२५ पासून अन्नधान्याचे वितरण करण्यात येणार नाही,याची नोंद घ्यावी.ई-केवायसी करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत:जवळच्या रेशन दुकानात जाऊन मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून स्वतः ऑनलाईन प्रक्रिया करता येईल.

या प्रक्रियेसाठी केंद्र शासनाने “Mera e-KYC Mobile App” आणि “Aadhar Face RD Service App” सुरू केली आहेत.या अ‍ॅप्सचा वापर करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे.

गुगल प्ले स्टोअरवरून दोन्ही अ‍ॅप्स डाऊनलोड करून इन्स्टॉल करा.

“Mera e-KYC” अ‍ॅप उघडा,राज्य व ठिकाण निवडा.आधार क्रमांक टाका व आलेला OTP भरून सबमिट करा.माहिती पडताळा करून ‘Submit’ करा.नंतर ‘Face E-KYC’ वर क्लिक करून डोळे हलवत सेल्फी द्या. प्रक्रिया यशस्वी झाली की, ‘E-KYC पूर्ण’ असा संदेश दिसेल.

तरी सर्व रेशनकार्डधारकांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी व शेवटच्या तारखेची वाट न पाहता आपल्या कुटुंबाच्या अन्नसुरक्षेसाठी तत्काळ पावले उचलावीत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती स्वाती शेंडे यांनी केले आहे.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *