शिधापत्रिका धारकांसाठी ई-केवायसी बंधनकारक ; 30 एप्रिलपर्यंत मुदत

Spread the love

धाराशिव –  शिधापत्रिकाधारकांना आधार क्रमांक जोडण्यासाठी (ई-केवायसी) करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल २०२५ आहे.आतापर्यंत धाराशिव तालुक्यात ७१ टक्के शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे.

ई-केवायसीसाठी ‘मेरा ई-केवायसी’ अॅपद्वारे नागरिकांना घरी बसूनच संपूर्ण प्रक्रिया करता येणार आहे.यासाठी आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आवश्यक असून,ओटीपीच्या माध्यमातून पडताळणी केली जाईल.त्यानंतर चेहऱ्याच्या पडताळणीसाठी https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd या अॅपचा वापर करून प्रक्रिया पूर्ण करता येईल.

यापूर्वी स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी करावी लागत होती.मात्र, तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.यावर उपाय म्हणून सरकारने ‘मेरा ई-केवायसी’ अॅप विकसित केले आहे,अशी माहिती तहसीलदार श्रीमती डॉ.मृणाल जाधव यांनी दिली आहे.

ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय धान्याचा लाभ घेता येणार नाही.अपात्र लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *