धाराशिव जिल्ह्यात मुख्यमंत्री दौऱ्यादरम्यान ‘नो फ्लाईंग झोन’ आदेश जारी

Spread the love

धाराशिव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २९ मार्च २०२५ रोजीच्या प्रस्तावित दौऱ्यानिमित्त सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील हेलिकॉप्टर लँडिंग परिसर ‘नो फ्लाईंग झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे.मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना Z+ सुरक्षा व्यवस्था आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षा कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या दिवशी हेलिकॉप्टर लँडिंग परिसरात कोणत्याही प्रकारचे ड्रोन (Unmanned Aerial Vehicles OR Remotely Piloted Aerial Systems) अथवा अन्य हवेत तरंगणाऱ्या वस्तू उडवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये हा आदेश जारी करण्यात आला आहे.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती,संस्था किंवा संघटनांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.सर्व संबंधितांनी आदेशाचे पालन करावे

सुरक्षाविषयक तातडीच्या कार्यवाहीसाठी संबंधितांना नोटीस देण्यास वेळेची मर्यादा असल्याने एकतर्फी आदेश काढण्यात आला आहे.त्यामुळे सर्व नागरिक,संस्था व संघटनांनी या आदेशाचे पालन करावे,असे. अपर जिल्हा दंडाधिकारी शोभा जाधव यांनी कळविले आहे.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *