जिल्हाधिकाऱ्यांनी केली धाराशिवच्या कचरा डेपोची पाहणी

Spread the love

पावसाळ्यापूर्वी कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे दिले निर्देश

धाराशिव – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आज ९ मार्च रोजी धाराशिव शहरातील कचरा संकलित करण्यात येणाऱ्या कचरा डेपोला भेट दिली.यावेळी त्यांच्यासोबत नगरपालिका प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अजित डोके,सहाय्यक मुख्याधिकारी पृथ्वीराज पवार,धाराशिव नगरपालिकेचे अधीक्षक श्री.कुलकर्णी,बांधकाम अभियंता श्री.दुबे,स्वच्छता विभागाचे विलास गोरे, लेखापाल अशोक फडतरे प्रामुख्याने उपस्थित होते.

येत्या पावसाळ्यापूर्वी कचरा डेपोत असलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात यावी व या कचऱ्याचे विलगीकरण करून त्यापासून खत निर्मितीचे काम पावसाळयापूर्वी पूर्ण करण्यात यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी नगरपालिका प्रशासनाला यावेळी दिले.

शहरातून दररोज किती कचरा संकलित होतो व कचरा डेपोत आलेल्या कचऱ्यावर आतापर्यंत किती प्रमाणात प्रक्रिया झाली आहे याबाबतची माहिती श्री.पुजार यांनी यावेळी घेतली.तसेच कचरा डेपोसाठी यापूर्वी विस्तृत प्रकल्प अहवाल हा ९० क्युबिक टन कचऱ्याचे विलगीकरण करून त्यापासून खत निर्मिती प्रस्तावित होते,त्याचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती श्री.डोके यांनी यावेळी दिली.

कचरा डेपोत आणखीही कचरा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे,त्यामुळे या कचऱ्यावर प्रक्रिया त्वरित करण्याचे निर्देश श्री.पुजारने दिले.प्रस्तावित विस्तृत प्रकल्प अहवाल हा साडेसहा कोटी रुपयांचा असून प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्तावित आहे. जवळपास १४ एकरमध्ये हा कचरा डेपो असल्याचे श्री.डोके यांनी सांगितले.

कचरा डेपोच्या प्रस्तावित विस्तृत प्रकल्प अहवालाबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल व या बैठकीत प्रस्तावित विस्तृत प्रकल्प अहवालावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे श्री पुजार यावेळी म्हणाले.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *